'जय भीम'च्या घोषणा ही अराजकता आहे का? अभिजीत दिपकेंचा CM फडणवीसांना सवाल

abhijeet dipke news : अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी मोदी सरकारवरही निशाणा साधला.
abhijeet dipke news update
abhijeet dipke newsSaam tv
Published On

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करून छत्रपती संभाजीनगरमधील घरी परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी मोदी सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी 'जय भीम'च्या घोषणा देतो, मुख्यमंत्र्यांना अराजक म्हणायचं आहे का? असा सवाल अभिजीत दिपके यांनी केला.

दिल्लीच्या जंतर मंतरवर तरुणांच्या आंदोलनाचं नेतृत्व अभिजीत दीपके यांनी केलं. ते दिल्लीतील आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत्या घरी परतले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दीपके म्हणाले की, 'मी 'जय भीम'च्या घोषण देतो, त्यास अराजक म्हणायचं आहे का? त्यांनी थोडा विचार करावा. ते यूपीचे मुख्यमंत्री नाहीत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. जो महाराष्ट्र पुरोगामी आहे. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, ते 'जय भीम'च्या घोषणा देतात, ते त्यांना कसं काय अराजक म्हणू शकतात, जे विधान त्यांनी केलं. त्यावर मला लाज वाटली'.

abhijeet dipke news update
मोठी बातमी! 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक दीपकेंना ठार मारण्याच्या धमक्या

परदेशात राहण्यावरून टीका झाली, त्यावर भाष्य करताना दीपके म्हणाले, एका पाकिस्तानीला दिल्लीत प्रदर्शन करू देता हे तुम्हाला म्हणायचं आहे का? वेदांत नावाच्या सीबीएससीच्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला सरकारने पाकिस्तानी म्हटलं आहे. त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, हा कारभार त्यांनी उघड केला. तेव्हा त्याला तुम्ही पाकिस्तानी म्हणतात'.

abhijeet dipke news update
Cockroach Janata Party: सरकारला प्रश्न विचारणारे पाकिस्तानी आहेत का? अभिजीत दीपके यांचा सवाल

'तुम्ही कोणाला कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहात. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता, रोजगार मागणाऱ्यांना पाकिस्तानी म्हणता, मग भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि आयटीसीवाले भारतीय आहेत का? आम्ही पाकिस्तानी हे कुठपर्यंत चालणार आहे, असा सवाल त्यांनी पुढे केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com