Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam tv

Maharashtra Political News: राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी स्थापन केलाय, तर अजित पवार...'; राज्यातील राजकीय घडामोडीवर आमदार सरोज अहिरे स्पष्टच बोलल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. याचदरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडीवर मोठं भाष्य केलं आहे.
Published on

Nashik News: राज्यातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे. या सर्व राजकीय घडामोडीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. याचदरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडीवर आमदार सरोज अहिरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, 'राज्यातील राजकीय घडामोडीच्या बातम्या माध्यमातून येत आहेत. राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला आहे. शरद पवार यांच्यानंतर दोन नंबरचे स्थान अजित पवार यांना आहे. पक्षाचे प्रमुख म्हणून शरद पवार यांना मी मानते. त्यामुळे शरद पवार यांच्या मान्यतेनुसार माझा निर्णय असेल'.

Maharashtra Political News
Ajit Pawar News : मोठी बातमी! भाषण न देण्याच्या अटीवरच अजित पवार नागपुरातील वज्रमुठ सभेला उपस्थित राहिले!

'मतदारसंघात मोठा निधी प्राप्त झाल्याने अजित पवार यांच्याबद्दल आदर आहे. आमदार नितीन पवार यांनी जी भूमिका व्यक्त केली, ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. आम्ही पक्षाच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे यांनी दिली.

Maharashtra Political News
Sanjay Raut On Ajit Pawar: 'मुख्यमंत्र्यांची अस्वस्थता मी समजू शकतो, पण..'; अजित पवारांच्या चर्चांवर संजय राऊतांचे स्पष्ट मत

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. या चर्चांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशामध्ये अजित पवार यांनी या चर्चांवर साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. 'नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा, त्यात काहीच तथ्य नाही', असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com