Ajit Pawar
Ajit PawarSaam TV

Ajit Pawar News : मोठी बातमी! भाषण न देण्याच्या अटीवरच अजित पवार नागपुरातील वज्रमुठ सभेला उपस्थित राहिले!

Ajit Pawar News : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धारला असतानाच आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Published on

Ajit Pawar News : राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धारला असतानाच आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. नागपूरमध्ये पार पडलेल्या महाविकासआघाडीच्या वज्रमुठ सभेला अजित पवारांनी भाषण न देण्याच्या अटीवरच उपस्थिती लावली होती अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

नागपूर येथे पाड पडलेल्या मविआच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांनी भाषण केले नव्हते. स्थानिक नेत्यांना संधी देणे आणि सभेचा वेळ वाढू नये आणि सभा ऐकण्यासाठी आलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण भाषण देणार नसल्याचा दावा अजित पवार यांनी या सभेपूर्वी केला होता. मात्र आता अजित दादांनी या सभेत भाषण न देण्याचा अटीवर उपस्थिती लावली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ajit Pawar
Maharashtra Political Crisis: सर्वात मोठी बातमी! भाजपचे राज्यात ऑपरेशन कमळ; मविआचे ४० आमदार फुटणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील सभेला अजित पवार येणारच नव्हते. या सभेपूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आयोजकांना कळविले देखील होते. मात्र सुनील केदार यांनी अजित पवार यांना फोन करून आग्रह केल्यावर वैयक्तिक संबंध म्हणून अजित पवार सभेला उपस्थित राहिले. मात्र आपण भाषण देणार नाही अशी अट अजित पवार यांनी घातली होती. (Maharashtra Political News)

अजित पवार भाजपसोबत जाणार?

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच अजित पवारांना त्यांच्या पक्षातील बहुतांश आमदारांचा पाठिंबा असल्याच्या देखील चर्चा आहेत. याच चर्चेदरम्यान आज राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना हा निरोप दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात पडद्यामागे बरंच काही घडत असल्याच्या चर्चा आहेत.

Ajit Pawar
Dhananjay Munde Not Reachable : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आहेत तरी कुठे? नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

बाजपचं राज्यात ऑपरेशन लोटस!

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरवात केली आहे. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे ४० आमदार फुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यात वज्रमूठ घेऊन पुढे जाणाऱ्या महविकास आघाडी खिंडार पाडण्याचा डाव भाजपने आखला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधीच मोठा घाव घालून महाविकासआघाडी खिळखिळी करण्याचा प्लान भाजपने आखाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com