Breaking News, Dhananjay Munde
Breaking News, Dhananjay Mundesaam tv

Dhananjay Munde Not Reachable : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आहेत तरी कुठे? नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Maharashtra Political News: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल, चर्चेला उधाण
Published on

Dhananjay Munde News : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेही नॉट रिचेबल आहेत. त्यांनी आपले दोन्हीही फोन बंद ठेवले आहेत. राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चे नंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. (Latest Marathi News)

Breaking News, Dhananjay Munde
Sugar Factory Election: 'विधान परिषद घ्या आणि...';माजी मंत्री विनय कोरे यांनी सतेज पाटील यांचं थेट नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट

धनंजय मुंडेंचे दोन्ही नंबर संपर्क क्षेत्रतच्या बाहेर आहेत. दरम्यान धनंजय मुंडे हे काल संभाजीनगरला जाऊन आलेत. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असताना. दुसरीकडे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मुंबई कडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)

Breaking News, Dhananjay Munde
Mankhurd Fire: मानखुर्दमध्ये मध्यरात्री अग्नितांडव! भंगार कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीत मोठं नुकसान

धनंजय मुंडे तडका फडकी मुंबईला रवाना झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यातच धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर बंद असल्याने या राजकीय घडामोडीचे गूढ आणखी वाढले आहे. या संपूर्ण घटनेमुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com