Political News: 'माझी बहीण प्रेमाने अमिताभ बच्चन म्हणाली असेल, मनावर घेऊ नका; केसरकर यांना अजित पवार असे का म्हणाले?

Ajit Pawar News: 'माझी बहीण प्रेमाने अमिताभ बच्चन म्हणाली असेल, मनावर घेऊ नका, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.
Ajit Pawar
Ajit Pawar saam tv
Published On

Ajit Pawaar News: मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिल्यानंतर राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. या ऑफरवर सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, अजित पवार हे अमिताभ बच्चन सारखे असून सर्वांना हवेहवेसे वाटतात. 'माझी बहीण प्रेमाने अमिताभ बच्चन म्हणाली असेल, मनावर घेऊ नका, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी अजित पवार यांनी दीपक केसरकर यांच्या राजकीय ऑफरवर देखील मनमोकळेपणाने भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, 'दीपक केसरकर यांनी मला ऑफर दिली. मी त्यांना आमदारकीचा तिकीट द्यायला सांगितलं. ते नगराध्यक्ष होते. पुढं मोठं राजकारण झालं. स्थानिक खटके उडाले. केसरकर मला म्हणाले होते की, दादा मला कामच करता येत नाही. काम होत नाही'. त्यामुळे नाऊमेद होऊन ते शिवसेनेत गेले'.

Ajit Pawar
Shiv Sena Kalyan Melava 2023: भाजप-शिवसेनेचा टोकाचा वाद संपला? श्रीकांत शिंदेंनी एकाच वाक्यात विषय संपवला

'केसरकर यांना पूर्वाश्रमीचे माझे आणि त्यांचे संबंध आठवले असतील. त्यामुळे केसरकर बोलले असतील. माझी बहीण आहे, ती प्रेमाने म्हणाली असेल. तुम्ही जास्त मनावर घेऊ नका, असे अजित पवार पुढे म्हणाले.

आगामी निवडणुकीच्या जागावाटपावर अजित पवार म्हणाले, 'तिघे पक्ष एकत्र आहेत. आपले जे मित्र पक्ष आहेत (संभाजी ब्रिगेड, वंचित आघाडी) त्यांना आपापल्या कोट्यातून जागा द्यावात. हे माझे मत आहे'.

Ajit Pawar
Video: युवक काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा; कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, 'मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अधिकार आहे. दिल्लीकरांचा अधिकार आहे, करायचं तेव्हा करतील. 23 जागा बाजूला ठेवून 25 जागांची पहिली चर्चा करू, मग ज्याने-त्याने जिंकलेल्या 23 जागांची चर्चा करू. भाजप सत्तेवर असणारा पक्ष आहे. ते त्यांच्या पद्धतीने यंत्रणा राबवणार त्यांचं काम करतील, आम्ही 3 पक्ष मिळून पुढं जायचं ठरवलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com