Shiv Sena Kalyan Melava 2023: भाजप-शिवसेनेचा टोकाचा वाद संपला? श्रीकांत शिंदेंनी एकाच वाक्यात विषय संपवला

Shrikanat Shinde on Shiv Sena Bjp Alliance Dispute: भाजप-शिवसेनेचा टोकाचा वाद संपला? श्रीकांत शिंदेंनी एकाच वाक्यात विषय संपवला
Shrikanat Shinde on Shiv Sena Bjp Alliance Dispute
Shrikanat Shinde on Shiv Sena Bjp Alliance DisputeSaam Tv

>> अभिजित देशमुख

Shrikanat Shinde on Shiv Sena-Bjp Alliance Dispute: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप शिवसेनेने सगळं आलबेल सुरु असल्याची चर्चा आहे. इथं दोन्ही पक्षांमध्ये बॅनर युद्ध सुरू झालं होतं. इतकंच काय तर एकमेकांवर टीका देखील केली जात होती.

यानंतर वरिष्ठ पातळीवर समेट झाल्यानंतर आज कल्याणमध्ये शिवसैनिकांचा पहिला मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांनी संयम बाळगावे, अशी सूचना श्रीकांत शिंदे यांचे शिवसेना कार्यकर्त्यांना दिली.

Shrikanat Shinde on Shiv Sena Bjp Alliance Dispute
Nitin Gadkari on Congress: काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं...

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

श्रीकांत शिंदे म्हणाले की, भाजप आणि शिवसेना एका विचारणे सोबत चालत आहे. मला सगळ्यांना सांगायचं आहे, खाली एकमेकांवर कोणी काही बोलत असलं तरी आपल्या लोकांनाही संयम पाळत युतीचा धर्म पाळला पाहिजे. कारण ही युती कुठल्या पदासाठी, कुठल्या मंत्रिपदासाठी झालेली नाही. ही युती एका विचारणे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी झाली आहे. (Latest Marathi News)

खासदार श्रीकांत शिंदे यांची संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्यावर टीका

संजय राऊत यांच्यावर टीका करत श्रीकांत शिंदे म्हणाले, सेक्युरिटीसाठी संजय राऊत यांनी बनाव केला. मुख्यमंत्र्यांना सांगितलं असतं तर सिक्युरिटी दिली असती. एवढं काय करायची गरज होती.

Shrikanat Shinde on Shiv Sena Bjp Alliance Dispute
Eknath Shinde News: 'आदिपुरुष'मध्ये एकनाथ शिंदे होते... वादग्रस्त ट्विट व्हायरल; ठाणे पोलिसांनी केली कमेंट

तसेच त्यांनी संजय राऊत आणि सुनील राऊत यांची तुलना तमाशातील काळूबाळू यांच्या जोडीशी केली. एवढं बोलता तर मग भीता कशाला असा, अप्रत्यक्ष टोला श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com