Nitin Gadkari on Joining Congress Party: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''एकदा एका नेत्याने त्यांना काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यावर त्यांनी त्याला उत्तर दिल की, ''काँग्रेस पक्षाचा सदस्य होण्यापेक्षा मी विहिरीत उडी घेईन.''
गडकरी यांनी दावा केला आहे की, काँग्रेसच्या ६० वर्षांच्या सत्ताकाळाच्या तुलनेत भाजप सरकारने गेल्या ९ वर्षात देशात दुप्पट काम केलं आहे. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी ते उत्तर प्रदेशमध्ये असताना त्यांनी लोकांना सांगितले होते की २०२४ च्या अखेरीस यूपीचे रस्ते अमेरिकेसारखे होतील.
गडकरींनी सांगितला तो किस्सा
शुक्रवारी गडकरींनी भंडारा येथे जाहीर सभेला संबोधित केले. येथे त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या कामाची आणि योजनांची माहिती दिली. गडकरींनी भाजपसाठी काम करतानाचे सुरुवातीच्या दिवसांची आठवण देखील सांगितली. काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांनी दिलेल्या ऑफरचाही त्यांनी उल्लेख केला. (Latest Marathi News)
गडकरी म्हणाले की, ''एकदा जिचकार मला म्हणाले, तू पक्षाचा खूप चांगला कार्यकर्ता आणि नेता आहेस. काँग्रेसमध्ये आल्यास तुझं भविष्य उज्ज्वल होईल. या ऑफरवर गडकरी म्हणाले, काँग्रेसमध्ये येण्याऐवजी मी विहिरीत उडी घेईन. माझा भाजप आणि त्याच्या विचारसरणीवर पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी मी काम करत राहीन.''
काँग्रेसबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, पक्ष स्थापनेपासून अनेकवेळा त्यात फूट पडली आहे. आपल्या देशातील लोकशाहीचा इतिहास आपण विसरता कामा नये. भविष्यासाठी आपण भूतकाळातून शिकले पाहिजे. काँग्रेसने आपल्या ६० वर्षांच्या सत्ताकाळात 'गरीबी हटाओ'चा नारा दिला, पण खाजगी फायद्यासाठी अनेक शैक्षणिक संस्था उघडल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.