Siddheshwar Factory : सोलापुरातील वादग्रस्त सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को -जनरेशनची चिमणी पडल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणात राजकीय पडसाद उमटत आहेत. आज काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी कारखान्याचे संचालक धर्मराज कडादी यांची भेट घेतली. त्यांनी सत्ताधारी भाजपला चॅलेंज केल आहे की, "बघुयात किती दिवसात तुम्ही तुमची विमानसेवा सुरु करताय, बोरामणी विमानतळाला फंड आणून विमासेवा सुरु करताय.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ''मी लिहून देते त्यांना हे जमणार नाहीये, फक्त वैयक्तिक राजकीय हेतूपोटी चिमणी पाडण्यात आली आहे. लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि पोटावर पाय देण्यासाठी हे ५० खोकेवाल भाजप सरकार जबाबदार आहे.''
त्या म्हणाल्या की, ''घडलेल्या सर्व प्रकारचा आम्ही निषेध करत आहोत. सर्व शेतकऱ्यांसोबत आमची सहानुभूती आहे. वैयक्तिक वैर आणि अहंकारामुळे हे केल गेलं आहे. भाजपची कार्यप्रणाली ही अशा पद्धतीने काम करायची आहे. विकास काम करणं भाजपला जमत नाही. महाराष्ट्रातील लोकांचा कसा मानसिक छळ करायचं, हे त्यांना व्यवस्थित जमतं.'' (Maharashtra News)
दरम्यान, विमानसेवेला अडथळा ठरणारी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशनची अनधिकृत ९२ मीटर उंचीची चिमणी पाडण्यात आली आहे. ही चिमणी पडताना कारखाना परिसरात तब्बल चार हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. (Latest Marathi News)
श्री सिद्धेश्वर कारखाना प्रशासनाने को-जनरेशनची ९२ मीटर उंच चिमणी उभारताना संबंधित यंत्रणांची परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. प्रामुख्याने चिमणी होटगी रोड विमानतळासाठी प्रमुख अडथळा असल्याचेही अनेक निष्कर्ष निघाले होते. त्यामुळे अनेक लढाया लढूनही कारखाना प्रशासनाला चिमणी वाचविण्यात यश मिळाले नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.