

रुपाली बडवे
राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अजित पवार गटाने शरद पवारांना 'हुकूमशाह' म्हणत टीका केली होती. त्यानंतर शरद पवारांनी छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी तत्काली) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. (Latest Marathi News)
शरद पवार यांनी छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी पत्र लिहून फडणवीसांना विनंती केली होती. 2018 मध्ये तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या प्रकृती संदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं होतं.
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळांची प्रकृती ढासळत असल्याच्या धक्कादायक बातम्या येत आहेत. वयाच्या 71 व्या वर्षी 14 मार्च 2016 (2 वर्षे) पासून ते तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे.
आतापर्यंत छगन भुजबळ यांच्यासंबंधीच्या कायदेशीर बाबींवर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. जोपर्यंत न्यायव्यवस्था निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत ते निर्दोष असल्याचे मानले जाते.
'जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे' असे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी सांगितले आहे. हेच तत्व छगन भुजबळ यांनाही लागू आहे. जामीन नाकारला जाणे दुर्दैवी आहे. छगन भुजबळ हे सार्वजनिक जीवनात 50 वर्षांहून अधिक योगदान असलेले ओबीसी नेते आहेत.
मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान नाकारता येणार नाही.
भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, याशिवाय मला काहीही अपेक्षित नाही. हा त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे.
छगन भुजबळ यांचं एकंदरीत आरोग्य आणि त्यांचे वाढलेले वय याची पूर्ण माहिती आहे. यामुळे मला खात्री आहे की छगन भुजबळ यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी तातडीने पावले उचलली जातील.
पुढील काळात भुजबळ यांच्यावर काही अप्रिय घटना घडली, तर त्यासाठी तुमचे सरकार जबाबदार राहील, हे नोंदवताना मला दुःख होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.