मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणांचा अजित पवारांना सल्ला, नेमकं काय घडलं?

Navneet Rana Warning To Ajit Pawar: अजित पवारांच्या भाजपवरील आरोपांनंतर नवनीत राणा यांनी मर्यादा ओलांडू नका असा इशारा दिला आहे.
NAVNEET RANA WARNS AJIT PAWAR AS POLITICAL TENSIONS ESCALATE IN MAHARASHTRA
NAVNEET RANA WARNS AJIT PAWAR AS POLITICAL TENSIONS ESCALATE IN MAHARASHTRASaam Tv
Published On

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आरोपांवर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांना थेट सल्ला देत वक्तव्य करताना मर्यादा पाळाव्यात असे म्हटले आहे. मात्र नवनीत राणांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले.

NAVNEET RANA WARNS AJIT PAWAR AS POLITICAL TENSIONS ESCALATE IN MAHARASHTRA
ऐन निवडणुकीच्या महासंग्रामात भाजपनं उचललं मोठं पाऊल, पक्षातील 22 बड्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

नवनीत राणा अजित पवारांच्या आरोपांवर म्हणाले, कोणतेही वक्तव्य करताना मर्यादा ओलांडू नका, असा सल्ला दिला होता. याच वक्तव्यावरून आमदार संजय खोडके यांनी आक्रमक भूमिका घेतली असून नवनीत राणा या आपल्या औकातीबाहेर जाऊन बोलत असल्याचा आरोप केला आहे.

NAVNEET RANA WARNS AJIT PAWAR AS POLITICAL TENSIONS ESCALATE IN MAHARASHTRA
Maharashtra Politics:निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून १ कोटीची ऑफर; शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप

खोडके यांनी नवनीत राणा यांच्या राजकीय प्रवासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, नवनीत राणा यांना पहिल्यांदा खासदार बनवण्यात काँग्रेसची मोठी भूमिका होती. काँग्रेसने तिकीट देऊन त्यांना संसदेत पाठवले, तरीही त्यांनी विश्वासघात केला, असा आरोप केला. इतकंच नाही तर भविष्यातही अशीच वक्तव्ये सुरू राहिली, तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा हिशोब ठेवू आणि पुढील निवडणुकीत त्या कशा जिंकतात ते पाहू, असा इशाराही संजय खोडके यांनी दिला आहे.

NAVNEET RANA WARNS AJIT PAWAR AS POLITICAL TENSIONS ESCALATE IN MAHARASHTRA
'देवाभाऊ' मुख्यमंत्री असेपर्यंत...'; ऐन निवडणुकीत लाडकी बहीण योजनेवर देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महायुती काही ठिकाणी सोबत लढत आहे तर काही शहरात एकमेकांच्या विरोधात लढत आहे. या प्रचाराच्या धामधुमीत एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. असेच पुणे महापालिका प्रचाराच्या दरम्यान अजित पवारांनी भाजपवर जोरदार प्रहार केला होता. यावरच नवनीत राणा यांनी पलटवार करत इशारा दिला आहे. राणा यांच्या वतव्याला अजित पवारांच्या आमदाराने तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com