Navi Mumbai: ऐन निवडणुकीत आमदार मंदा म्हात्रे आणि नाईकांमधील वाद पुन्हा उफाळला, नवी मुंबईचं राजकारण तापलं

Mla Manda Mhatre Ganesh Naik Dispute: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मंदा म्हात्रे-गणेश नाईक यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलाय. म्हात्रे यांनी नाईकांना १११ नगरसेवक निवडणून आणण्याचं आव्हान दिलंय.
Mla Manda Mhatre Ganesh Naik Dispute:
BJP leaders Manda Mhatre and Ganesh Naik amid rising political tensions in Navi Mumbai ahead of civic polls.saam tv
Published On
Summary
  • महापालिका निवडणुकीच्या ऐनवेळी भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला

  • मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा समोर

  • तिकीट वाटपावरून १११ नगरसेवकांनी नेतृत्वाला आव्हान दिलं.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्याचदरम्यान अनेक ठिकाणी तिकीट न भेटलेल्या उमेदवारांनी वाद घातला. भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्यांना तिकीट दिल्यानं अनेकांनी आक्षेप घेतला. नवी मुंबईतही उमेदवारी देण्यावरून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

नवी मुंबईतील आमदार मंदा म्हात्रे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. महापालिका निवडणुकीच्या घोषणा झाल्यापासून दोन्ही नेते शांत होते. मात्र आता निवडणुका ऐन रंगात आल्या असताना दोन्ही नेत्यांमधील पुन्हा एकदा उफाळून आलाय.

Mla Manda Mhatre Ganesh Naik Dispute:
Thane : एकनाथ शिंदेंचा खासदार म्हस्केंना झटका, मुलाचे तिकिट कापले, आनंद आश्रमात कार्यकर्त्यांची गर्दी

माझ्यावर अन्याय करा, पण कार्यकर्त्यांना डावलू नका. ज्यांनी भाजपाचे काम केले त्यांना तिकीट दिल जात नाही. माझ्या मतांवर डोळा ठेवून ज्या लोकांनी तुतारीला मतदान केलं त्यांना उमेदवारी दिली जात आहे, हा कोणता मर्दपणा? असा सवाल करत आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल केलाय.

तुमच्यात हिंमत असेल तर १११ नगरसेवक निवडून आणा. आम्ही भाजपसोबत आहोत. यांच्यासारखे गद्दार नाहीत. जे तिकीट न मिळाल्यास तुतारीवर लढतात. दुबई, पाकिस्तानवरून धमक्यांचे फोन करायचे, हे धंदे आम्ही केले नाहीत, अशा संतप्त भावना मंदा म्हात्रे यांनी मांडल्या.

Mla Manda Mhatre Ganesh Naik Dispute:
Municipal Election : नाशिकमध्ये महाभारत! भाजपमध्ये उमेदवारांची फरफट, एबी फॉर्मसाठी आमदारांच्या कारचा पाठलाग, सिनेस्टाईल राड्याचा घटनाक्रम

घराणेशाहीवरूनही म्हात्रे यांनी नाईकांवर शरसंधान साधलंय. नाईकांना कुटुंबाशिवाय काही दिसत नाही. ते घरात ५-५ उमेदवारी देत आहेत. गणेश नाईकांना आपण दोनदा पाडलंय. आता तेच गणेश त्यांच्या कार्यकर्त्यांना घरी बसवत आहेत. त्यांची मुलेही घरी बसतील. ज्यांना तिकीट दिले त्यांनी कधी पक्षाचे कमळ तरी हातात घेतले होते का? भाजपा कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम होतंय.

राष्ट्रवादीला जसे गंडवले तरी भाजपाला गंडवण्याचं काम गणेश नाईक करत असल्याची टीका मंदा म्हात्रे यांनी केली आहे. तुम्ही खरे नेते असाल तर १११ नगरसेवक निवडून आणा असं चॅलेंजही म्हात्रे यांनी गणेश नाईकांना दिलंय.

जर नाईकांनी १११ नगरसेवक निवडून आणले तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, असंही म्हात्रे म्हणाल्या आहेत. नाईकांचा डोळा बेलापूरवर आहे. पण त्यांना अजून जाग आली नाहीये. मी पक्षासोबत आहे. ज्या लोकांना गणेश नाईकांनी घेतले त्यांना तिकीट दिले. येथल्या लोकांचे प्रश्न गणेश नाईक सोडवते का मंदा म्हात्रे हे सगळ्यांना माहिती आहे, असंही त्या म्हणाल्या. पक्षाकडून मला १३ एबी फॉर्म देण्यात आले.

ते भरायला सांगितले परंतु त्यावर जिल्हाध्यक्षांनी सही केली नाही. सकाळपासून ते गायब आहेत. त्यांना कोणी किडनॅप केलंय का ते स्वत: गायब आहेत, का कोणाचा दबाव आहे, असा आरोपही मंदा म्हात्रे यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com