Maharashtra Politics:निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून १ कोटीची ऑफर; शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप

Dhule Politics Shiv Sena Candidate Allegation: महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे सेनेचे नेत्यानं भाजपवर गंभीर आरोप केलेत. उमेदवारांना माघार घेण्यासाठी भाजप पैशांची ऑफर देत असल्याचा आरोप धुळ्यातील शिंदे नेत्यानं केलाय. यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झालाय.
Dhule Politics Shiv Sena Candidate Allegation
Shinde Sena leader Sanjay Valhe alleges BJP offered ₹1 crore to make elections unopposed.saam tv
Published On
Summary
  • धुळे महापालिकेत महायुतीतील भाजपा आणि शिंदेसेना आमनेसामने लढत आहेत.

  • उमेदवारी माघारीसाठी एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा

  • महायुतीचे ६५ हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले

राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष बऱ्याच ठिकाणी एकमेकांविरोधात लढले. मात्र महापालिका निवडणुकीत बिनविरोध पॅटर्नमुळे विरोधक धास्तावले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार बिनविरोध झालेत. महायुतीचे ६५ हून अधिक उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनलेत.

यावरून विरोधक महायुतीवर दमदाटी, पैशाचे आमिष दाखवत असल्याचा आरोप करत आहेत. परंतु आता भाजपने शिंदे सेनेच्या उमेदवाराला पैशांची ऑफर दिलीय. धुळ्यातील शिंदेसेनेचे नेते संजय वाल्हे यांनाही भाजपनं पैशांची ऑफर दिल्याची बाब उघकीस आलीय.यामुळे विरोधकांच्या आरोपांना महत्त्व प्राप्त झालंय. शिंदेसेनेचे नेते संजय वाल्हे यांनी भाजपवर पैशाची ऑफर दिल्याचा आरोप केलाय.

धुळे महापालिकेत महायुतीतील भाजपा आणि शिंदेसेना आमनेसामने लढत आहेत. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून शिंदेसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या पत्नी सविता वाल्हे या निवडणुकीला उभ्या आहेत. वाल्हे यांच्या पत्नीने निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपकडून १ कोटी देण्याची ऑफर देण्यात आलीय. परंतु ही ऑफर आपण नाकारल्याचा दावा वाल्हे यांनी केलाय.

Dhule Politics Shiv Sena Candidate Allegation
Tanaji Sawant: गद्दारी केली तर ठेचून काढणार; शिंदे सेनेच्या आमदाराचा पदाधिकाऱ्यांना दम

याबाबत संजय वाल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात संजय वाल्हे यांनी माझी पत्नी सविता वाल्हे हिने प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीच्या ऑफर देण्यात आल्या. धुळे शहरात भारतीय जनता पार्टीने लोकशाही पद्धतीने होणारी निवडणूक होऊच नये यासाठी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी ऑफर देत आहे.

तसेच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी १.४५ च्या सुमारास २ जण माझ्याकडे आले. माझ्या पत्नीच्या विरोधात जे भाजपचे उमेदवार आहेत, त्यांना बिनविरोध करण्यासाठी आपण १ कोटी घ्यावेत. ही निवडणूक बिनविरोध करावी, असे सांगितले असं संजय वाल्हे यांनी म्हणाले. परंतु आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे.

Dhule Politics Shiv Sena Candidate Allegation
Pune Politics: 'हाच का दादांचा वादा? जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का? अजितदादांना प्रश्न विचारणारे बॅनर्स व्हायरल

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात काम करतो. शिवसेना कधीही पैशांसाठी काम करत नाही. या प्रभाग क्रमांक १० मधील जनतेचा आशीर्वाद सविता वाल्हे यांच्या मागे आहे. त्यामुळे आपण १ कोटींची ऑफर धुडकावून लावली असेही उमेदवारचे पती संजय वाल्हे म्हणाले. दरम्यान धुळे महापालिकेतील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात संजय वाल्हे एका महिला उमेदवाराच्या हात जोडून पाया पडताना दिसते. त्यात महिला उमेदवारी माघारी घेऊ नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तुम्ही माघारी घेऊ नका असं म्हणताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com