Pune Politics: 'हाच का दादांचा वादा? जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का? अजितदादांना प्रश्न विचारणारे बॅनर्स व्हायरल

Ajit Pawar Banner Viral In Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. पुण्यात अजित पवारांना प्रश्न विचारणारे बॅनर्स लावण्यात आली आहेत. व्हायरल बॅनर्समुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. मतदारांच्या नावाने हे बॅनर लावण्यात आली आहेत.
Ajit Pawar Banner Viral In Pune:
Viral banners questioning Ajit Pawar’s promises spark political debate across Pune.saam tv
Published On
Summary
  • पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनर वॉर

  • अजित पवार यांच्यावर विरोधकांचा थेट हल्ला

  • “हाच का दादांचा वादा?” या वाक्याची शहरभर चर्चा

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुण्यात महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. हाच का दादाचा वादा? अशा प्रकराचे बॅनर अख्खा पुण्यात लावण्यात आलेत. या बॅनरची संपूर्ण शहरात चर्चा सुरू आहे. विरोधकांनी अजित पवार यांना बॅनरच्या माध्यमातून प्रश्न करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी प्रमुख अजित पवार यांच्यावर टीका देखील यातून करण्यात आली आहे.

राज्यात सत्तेत असलेले भाजप, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांचे शत्रू बनलेत. राष्ट्रवादीने गुंडांना तिकिटे दिल्याचा मुद्दा उपस्थित करत या लढाईला भाजपने तोंड फोडले. याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत आपला दम दाखवला. अजित पवार यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा काढत भाजपची दुखती नस दाबली.

Ajit Pawar Banner Viral In Pune:
सादिक कपूर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; अजित पवार गटाच्या पुण्यातील उमेदवारावर गुन्हा

दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार गटाशी आघाडी केली आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवार यांच्यात संघर्ष पेटलाय. अजित पवार यांनी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधलाय. आता पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करणारी बॅनर्स लावण्यात आली आहेत. मतदारांच्या नावाने शहरातील चौका चौकात बॅनर लावण्यात आली आहेत.

Ajit Pawar Banner Viral In Pune:
Uddhav Thackeray: खोकासुराने ३ हजार कोटींचा घोटाळा केला, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर गंभीर आरोप

हाच का दादाचा वादा?

पुण्यातील प्रभाग क्र ९ मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा यांना प्रश्न विचारणारे बँनर्स लावण्यात आले आहेत. हाच का दादाचा वादा? अशा मथळ्याखाली बॅनर लावण्यात आली आहेत.

कोणती प्रश्न विचारण्यात आली आहेत.

अजितदादा तुम्ही प्रभाग क्र ९ मध्ये पैसे वाटणाऱ्यांच्या प्रचार करणार का ? हाच का दादाचा... वादा

अजितदादा तुम्ही प्रभाग क्र ९ मध्ये जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का ? हाच का दादाचा... वादा

अजितदादा तुम्ही प्रभाग क्र ९ मध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचा प्रचार करणार का ? हाच का दादाचा... वादा

दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे परंतु प्रचंड नाराज असणारे प्रभाग क्र ९ मधील सर्व मतदार.

आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रभाग क्र ९ मध्येच जाहीर सभा आहे. त्यामुळे दादा याला काय उत्तर देतात याकडे सगळयांचे लक्ष आहे. थेट अजित पवार यांनी लक्ष केल्याने पुण्यात सर्वत्र या बॅनरची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com