भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी अखेर नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतली. मागच्या काही दिवसांपासून ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र शिंदेसेनेचे नेते मंत्री उदय सामंत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. मात्र आपण निवडणूक लढवणार असा ठाम निर्धार त्यांनी केला होता. नाशिकमधून शिंदेसेनेकडून नरेंद्र दराडे हे उमेदवार आहेत. या जागेसाठी भाजपचा देखील आग्रह होता.
मात्र पारंपरिक शिवसेनेची जागा असल्याने भाजपला ही जागा मिळाली नाही. गणेश आणि गोकुळ गीते यांनी निवडणुकीचा अर्ज भरला होता. गोकुळ गीते हे भाजपमध्ये असून त्यांची पत्नी नगरसेविका आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठीचा आदेश आल्याने गणेश गीते यांनी माघार घेतली. तर गोकुळ गीते हे सध्यातरी कुठल्याही पक्षात नसल्याने ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेर आज उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी त्यांच्या घरी जात त्यांच्याशी चर्चा करून शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यास सांगितला.
काल मुंबईत गिरीश महाजन यांची मुख्यमंत्री आणि गोकुळ गीते यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. यानंतर आज मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत थेट नाशिकमधील गीते बंधूंच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे देखील त्याठिकाणी आले. या सर्वांमध्ये बंददाराआड चर्चा झाली. या चर्चे दरम्यान गोकुळ गीते यांनी मंत्र्यांसमोर नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडे याला बाप काढण्यावरून चांगलेच सुनावले. गोकुळ गीते यांची नाराजी लक्षात घेता दोन्ही मंत्र्यांनी त्यांची समजूत काढली. तसेच भविष्यात वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याचा सज्जड दम मंत्र्यांनी दराडे कुटुंबीयांना दिला. या सगळ्या राजकीय नाट्यानंतर गोकुळ गीते यांनी आपला निवडणूक प्रचार थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.