लॅपटॉप समोर ठेवून करायचा लैंगिक अत्याचार, ७ महिन्यांच्या गरोदर महिलेलाही सोडलं नाही; भोंदू खरात प्रकरणात हादरावणारी माहिती उघड

ashok Kharat case : भोंदू अशोक खरातला नाशिक कोर्टात हजर केले. त्याच्याविरोधात तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात महत्वाचे पुरावे सादर केले.
nashik news update
nashik News Saam tv
Published On
Summary

अशोक खरात प्रकरणातील हादरवणारी माहिती समोर आलीये

दोन आठवड्यांपासून खरातची कसून चौकशी

तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली खळबळजनक माहिती

भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ खळबळजनक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांकडून खरातची कसून चौकशी सुरू येत आहे. शेकडो महिलांचं शोषण करणाऱ्या खरातला आज गुरुवारी सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात कागदपत्रे आणि लॅपटॉप देखील आणला. भोंदू खरात हा लॅपटॉप समोर ठेवून महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा, असा संशय व्यक्त केला. भोंदू खरातने ७ महिन्यांच्या गरोदर महिलेला देखील सोडले नसल्याचे धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितली.

भोंदू खरातला आज गुरुवारी कोर्टात हजर केले. त्याला तिसऱ्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टात सरकारी वकील, तपास अधिकारी, आरोपीचे वकील होते. न्यायमूर्ती बी एन इचपुराणिक यांच्या समोर सुनावणी झाली. तपास अधिकाऱ्यांनी कागदपत्रे आणि सोबत लॅपटॉप आणला होता. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी महत्वाचे पुरावे सादर केले.

nashik news update
कॅप्टन खरात महिलांचं शोषण करणारा भोंदूबाबा; महिला अत्याचाराचे 58 व्हिडीओ समोर?

तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाकडे अशोक खरातची ७ दिवसांची कोठडी मागितली. परंतु कोर्टाने खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली. खरातने 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झालं आहे. त्याने सातव्या महिन्यात नजर लागते म्हणून विशिष्ट विधी करावा लागतो असे सांगितले. त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. तसेच बाजारातील चिंचोके पॉलिश करून लाखों रुपयांना विकले. विधी करत असताना नकली साप, नाग, वाघाचे कातडे दाखवण्यात आले.

nashik news update
भोंदू अशोक खरातला आणखी गोत्यात; ३ दिवसांसाठी पुन्हा पोलीस कोठडीत, कोर्टात नेमकं काय घडलं?

नकली साप, नाग, वाघाचे कातडे हे कुठून आणले, याचा तपास हा अधिकाऱ्यांना करायचा आहे. त्याचबरोबर नकली खडे त्याने कोणाकडून घेतले, याचा तपास देखील करायचा आहे. लैंगिक अत्याचार करताना त्याने लॅपटॉपसमोर ठेवून व्हिडिओ काढल्याचा संशय आहे. खरातच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. आरोपी हुशार आणि चाणाक्ष आहे. आरोपी खरात तपासात सहकार्य करत नाही, असेही अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com