रोहिदास गाडगे, साम टीव्ही
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेबाबत केंद्र सरकारने राजपत्र अधिसूचना जारी करत नव्या शिर्डी मार्गाला अधिकृत मंजुरी दिली आहे. मात्र, या प्रकल्पावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, ही नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला मंजुरी नसून नाशिक-अहिल्यानगर रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे, असा दावा केला आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मंजुरीबाबत सध्या ज्या बातम्या समोर येत आहेत. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले. पुणे-अहिल्यानगर आणि नाशिक रोड-शिर्डी हे स्वतंत्र प्रकल्प असून, त्यांच्या भूसंपादनाला सुरुवात झाली म्हणजे पुणे-नाशिक रेल्वेला मंजुरी मिळाली, असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं कोल्हे यांनी स्पष्ट केले. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची व्यवहार्यता तपासण्यासाठी काकोडकर समिती स्थापन करण्यात आली असून समितीला ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पुणे-अहिल्यानगर आणि नाशिक रोड-शिर्डी या दोन स्वतंत्र प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं.
त्यामुळे या प्रक्रियेला थेट पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला मंजुरी मिळाल्याचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा त्यांनी केला. माध्यमांनी या विषयाची व्यवस्थित माहिती घेऊनच बातमी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काकोडकर समितीची घोषणा करत असताना अशा बातम्यांमुळे महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेबाबत गैरसमज निर्माण होत असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. अमोल कोल्हे यांच्या या दाव्यामुळे नेमका कोणता रेल्वेमार्ग मंजूर झाला आहे असा मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
याआधी प्रस्तावित असलेल्या संगमनेर-नारायणगाव मार्गाऐवजी आता ही रेल्वे नाशिक-सिन्नर-शिर्डी-पुणतांबा-अहिल्यानगर मार्गे धावणार असल्याचे केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे. या नवीन मार्गासाठी सुमारे 8 हजार 970 कोटी रुपयांचा आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चात मोठी बचत करण्याच्या उद्देशाने हा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.