Adulterated Milk: भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Nashik News : भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Adulterated Milk
Adulterated MilkSaam tv
Published On

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : दुधातील भेसळ हा कायमच गंभीर विषय बनला आहे. (Adulterated Milk) अन्न व औषधी प्रशासन या विरोधात कारवाई करत आहे. याच दरम्यान अन्न व औषधी प्रशासनाने निफाड पोलिसांच्या (Police) मदतीने छापा टाकत भेसळ केलेले दूध नष्ट करत भेसळ करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.  (Live Marathi News)

Adulterated Milk
Bhandara News : अंत्यसंस्कारासाठी जमलेल्यांनी अचानक काढला पळ; स्मशानभूमीत घडले भयानक

नाशिकच्या निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे अन्न व औषध प्रशासन आणि निफाड पोलीस यांना दुधात भेसळ होत असल्याची माहिती गुप्त माहितीदारामार्फत मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने (FDA) बोकदरे येथील अतुल कातकडे यांच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी तेथे एक व्यक्ती दुधात काहीतरी मिसळत असल्याचे आढळून आले.  

Adulterated Milk
Manmad Accident News: ट्रकने सायकलस्वारास चिरडले; येवला- मनमाड महामार्गावर अपघात

भेसळ केलेले ४२० लिटर दूध नष्ट 

पंचासह परिसराची झडती घेतली असता डेअरी परमीट पावडर १८ किलो, व्होल मिल्क पावडर ३४ किलो, तेलसदृश पदार्थ १७० लिटर आढळून आले. शिवाय या पदार्थांची भेसळ करून बनविलेले ४२० लिटर गाय दूधाचा साठा विक्रीसाठी तयार केल्याचे आढळून आले. हे ४२० लिटर दूध नष्ट करत ४८ हजार १८६ रुपये किमतीचा साठा जप्त करत ३ जणांविरोधात कारवाई केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com