Manmad Accident News
Manmad Accident NewsSaam tv

Manmad Accident News: ट्रकने सायकलस्वारास चिरडले; येवला- मनमाड महामार्गावर अपघात

Manmad News: ट्रकने सायकलस्वारास चिरडले; येवला- मनमाड महामार्गावर अपघात
Published on

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या धानोरा शिवारात माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने (Manmad) सायकलस्वारास धडक देत चिरडल्याची घटना घडली. हा अपघात येवला- मनमाड महामार्गावर (Accident) दुपारी घडला आहे. (Breaking Marathi News)

Manmad Accident News
Nashik News: नोकरी नाही, घरखर्चासाठी पैसे नसल्याने निवडला चुकीचा मार्ग

येवला- मनमाड महामार्गावर झालेल्या अपघातात जनार्धन गायकवाड (वय ५५) यांचा मृत्यू झाला आहे. जनार्दन गायकवाड हे बाजारात सायकलने जात होते. बाजारात पोहचण्यापूर्वीच त्यांना ट्रकने धडक दिली. यात ते खाली पडले. यानंतर ५० फूट लांब फरफटत नेले. त्यात त्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  

Manmad Accident News
Bhandara News : अंत्यसंस्कारासाठी जमलेल्यांनी अचानक काढला पळ; स्मशानभूमीत घडले भयानक

ट्रक चालक फरार 

सदर अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात हलविला. दरम्यान ट्रक चालक घटनास्थळाहुन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक मात्र काही काळ विस्कळीत झाली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com