Nashik News: डॉक्टरच्या हातातून पडून नवजात बालकाचा मृत्यू; कुटुंबीयांचा आरोप

Nashik News: महिलेच्या प्रसूतीदरम्यान प्रशिक्षण देताना डॉक्टरच्या हातातून पडून बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Hospital
HospitalSaam tv
Published On: 

Nashik News:

नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेच्या प्रसूतीदरम्यान प्रशिक्षण देताना डॉक्टरच्या हातातून पडून बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गोंधळ केला. नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, वसंतराव पवार मेडिकल रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या प्रसूतीदरम्यान प्रशिक्षण देताना रुग्णालयातील डॉक्टरच्या हातातून पडून बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर नवजात बालकाच्या नातेवाईकांनी वसंत पवार मेडिकल रुग्णालयामध्ये डॉक्टरांवर एकच आरडोओरड करायला सुरुवात केली.

Hospital
Mumbai Crime News : व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला, समोर महिला अन् ते दृश्य बघून ७३ वर्षांचे आजोबा हादरलेच

डॉक्टरच्या चुकीमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर रुग्णालयाने स्पष्टीकरण दिलं. नवजात बालकाच्या मृत्यूनंतर बाळ आधीच दगावल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.

नवजात बालकाच्या मृत्यूनंतर दिलेल्या स्पष्टीकरणानंतर डॉक्टरांनी दिशाभूल केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या डॉक्टरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Hospital
Pune Crime News: दसरा-दिवाळीसाठी घरी तूप आणताय? सावधान! पुणे पोलिसांकडून ६५० किलो बनावट तूप जप्त

पोलिसांत गुन्हा दाखल

या नवजात बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर बालकाच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे. या प्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात कुटुंबीयांकडून तक्रार दखल करण्यात आली आहे.

Hospital
Pimpri Chinchwad Crime News: भंगार खरेदीवरून किरकोळ वाद, जंगलात नेलं अन्...; पिंपरी-चिंचवडमधील थरारक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.