अक्षय बडवे
दसरा-दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसरा-दिवाळीसाठी घरी गोडधोड बनविण्यासाठी अनेक गृहिणींकडून दुकानातून तूपासहित इतर साहित्य आणण्याचा योजना सुरू आहेत. याचदरम्यान, पुण्यात पोलिसांनी ६५० किलो बनावट तूप जप्त केले आहेत. पोलिसांनी पाषाण गावामध्ये ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी ६५० किलो बनावट तूप जप्त केले आहे. पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर हे बनावट तूप विकल्या गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील पाषाण गावातून पोलिसांनी तब्बल ६५० किलो बनावट तूप जप्त केले आहे. पाषाण गावात संग्रामसिंग तेजसिंग राजपूत या नावाचा व्यक्ती भेसळ करत होता. गेल्या ६ महिन्यांपासून राजपूत हा तुपामध्ये भेसळ करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पाषाण भागातील भगवती नगर येथे संग्रामसिंग तेजसिंग राजपूत (वय ३८) वर्षे हा पत्र्याच्या शेड मध्ये तूपामध्ये खाण्याचे सोयाबीन तेल, डालडा मिक्स करून बनावट तूप तयार करताना आढळला.
पोलिसांनी छापेमारी करत या जागेवरून १३५ किलो तेल,१०५ किलो डालडा, ५४ पत्र्याचे मोकळे डबे, डबे पॅक करण्याचे मशीन आणि झाकण असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ही कारवाई करत या तूपाचे नमुने अन्न व औषध प्रशासनला पाठवले आहेत.
बनावट तूप कुठल्या आणि कोणाला विकले गेले, याचा तपास करणे महत्वाचे ठरणार आहे. पोलिसांच्या छापेमारीनंतर अन्न व औषध प्रशासन बनावट तूप प्रकरणी काय कारवाई करते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.