Hyderabad Crime News: अभ्यास न केल्याने शिक्षकाकडून अमानुष मारहाण; चिमुकल्याचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं हैदराबाद हादरलं

Teacher Punished Student: अभ्यास पूर्ण न करणाऱ्या मुलांना वर्गाबाहेर उभं केलं जातं.
Crime News
Crime Newssaam tv
Published On

Hyderabad News:

शाळेतून दिलेला गृहपाठ करण्याचा सर्वच मुलं कंटाळा करतात. यासाठी वेगवेगळी कारणे शोधतात. मात्र गृहपाठ न झाल्यास दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर शिक्षा मिळते. अभ्यास पूर्ण न करणाऱ्या मुलांना वर्गाबाहेर उभं केलं जातं. तर काही शिक्षक हातावर छडी मारत विद्यार्थ्यांना शिक्षा देतात. हैदराबादमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये शिक्षकाने दिलेल्या शिक्षेमुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

Crime News
Chakan Crime: व्यावसायिकाचे अपहरण, १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, फिल्मी स्टाईलने पैसे न्यायला अन् जाळ्यात अडकला!

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत्यू झालेला मुलगा अवघ्या ५ वर्षांचा होता. तो रमांथपूर येथील खासगी शाळेत यूकेजीच्या वर्गात शिकत होता. शिक्षकाने त्याला आदल्या दिवशी काही गृहपाठ दिला होता. मात्र त्याने गृहपाठ पूर्ण केला नाही. अभ्यास केला नाही म्हणून टिचर आपल्याला जास्तीत जास्त वर्गाबाहेर उभ्या करतील असं काही त्याच्या मनात असावं. मात्र प्रत्यक्षात भयंकर घडलं.

शाळेत आपला मृत्यू होणारे असं या चिमुकल्याच्या ध्यानीमनीही नसेल. बागडत, खेळत आणि मस्ती करत चिमुकला शाळेत गेला. गृहपाठ न केल्याने टिचरने त्याला उभं केलं. त्यानंतर स्टीलच्या पट्टीने त्याच्या डोक्यावर जोरात वार करून त्याला शिक्षा दिली. पट्टीचा घाव बसताच चिमुकला धाडकन खाली कोसळला.

त्याला दुखापत झाल्याचे समजताच शाळेतील इतर शिक्षकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मात्र त्याला वाचवण्याच यश आले नाही. सोमवारी मृत्यूशी सुरू असलेली झूंज संपली आणि चिमुकल्याची प्राणज्योत मावळली.

मुलाच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाल्यावर कुटुंबियांनी शाळेत आंदोलन करण्यास सुरूवात केली. तसेच शिक्षकाविरोधात पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Crime News
Beed Crime News: दारू पिण्यासाठी मोटारसायकलींची चोरी; दुचाकी चोरांची टोळी जेरबंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com