Chakan Crime: व्यावसायिकाचे अपहरण, १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, फिल्मी स्टाईलने पैसे न्यायला अन् जाळ्यात अडकला!

Pimpari Chinchwad Crime: अपहरण केल्यानंतर आरोपींनी संजय धुलाप्पा कुरुंदवाडे यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती
Pune Chakan Crime News
Pune Chakan Crime NewsSaam tv

Pimpari Chinchwad Crime:

व्यावसायिकाला तब्बल १ कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी- चिंचवड मधील चाकण परिसरातून समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. (Crime News In Marathi)

Pune Chakan Crime News
Raju Shetti : 'स्वाभिमानी' चा साखर कारखानदारांच्या विराेधात ढाेल बजाओ, राजू शेट्टींची पुढच्या आंदाेलनाची दिशा स्पष्ट

याबाबत अधिक माहिती अशी की, चाकण (Chakan) परिसरात राहणाऱ्या संजय धुलाप्पा कुरुंदवाडे हे व्यावसायिक आहेत. 21 सप्टेंबरला संजय धुलाप्पा कुरुंदवाडे हे आपल्या मोटर सायकलने घराकडे जात असताना, त्यांना काही आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला रिक्षा आडवी लावून अडवले आणि त्यांचे अपहरण केले होते. अपहरण केल्यानंतर आरोपींनी संजय धुलाप्पा कुरुंदवाडे यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

फिर्यादीने आरोपींना खंडणी देण्याचे मान्य केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला सोडले होते. मात्र आरोपींपैकी एक इसम फिल्मी स्टाईलने खंडणीचे पैसे घेण्यासाठी आल्यानंतर चाकण पोलिसांनी या गुन्ह्यातील पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर दोन खंडणीखोर आरोपी अजूनही फरार आहेत. (Latest Marathi News)

शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे, आकाश विनायक भुरे, शुभम युवराज सरवदे ,अजय नंदू होले आणि नवनाथ शांताराम बच्चे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. तर या खंडणी गुन्ह्यातील दोन आरोपी अजूनही फरार आहेत.

या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, मारामारी, जबरी चोरी, आणि अवैध शस्त्र बाळगणे असे गुन्हे चाकण, हडपसर, राजगड आणि भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. (Latest Marathi News)

Pune Chakan Crime News
Dhangar Reservation: सोलापुरात धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला; आंदोलकांचा सोलापूर - विजापूर महामार्गावर रास्ता रोको

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com