राज्यात मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचा प्रश्नही चांगलाच तापला आहे. राज्यातील विविध भागात धनगर समाज बांधवांकडून आंदोलने सुरू केली आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये धनगर समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करत सोलापूरमधील बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली. सोमवार (२, ऑक्टोंबर) धनगर आरक्षण कृती समितीकडून सोलापूरमध्ये (Solapur) आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी सोलापूर - विजापूर राष्ट्रीय महामार्ग (Solapur- Vijayapur National Highway) रोखत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सोलापूरहुन विजापूर आणि विजापूरहुन सोलापूरकडे येणारी सर्व वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
मोहोळमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन....
दरम्यान, धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी धनगर बांधवांकडून मोहोळमध्ये (Mohol) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (३, ऑक्टोंबर) ला हा मोर्चा होणार असल्याची माहिती धनगर प्रदेश महासंघाचे सदस्य बिरुदेव देवकते यांनी दिली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.