Mumbai Crime News : व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला, समोर महिला अन् ते दृश्य बघून ७३ वर्षांचे आजोबा हादरलेच

Crime News : मुंबईतील मालाड पूर्वेकडील ७३ वर्षीय व्यक्ती सेक्स्टॉर्शनला बळी पडलीये.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On

Mumbai Crime News :

मुंबईतील मालाड पूर्वेकडील ७३ वर्षीय व्यक्ती सेक्स्टॉर्शनला बळी पडलीये. व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये उकळले. या विचित्र प्रकाराने संबंधित व्यक्ती हादरून गेलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, ७३ वर्षीय व्यक्ती मालाड पूर्वेकडे राहते. दिंडोशी पोलीस ठाण्यात त्यांनी याबाबत तक्रार केली आहे. त्यानुसार, २६ सप्टेंबरला दुपारी सव्वातीनच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला. त्यांनी तो कॉल उचलला. समोर स्क्रीनवर महिला होती. तुम्ही कोण आहात अशी त्यांनी महिलेला विचारणा केली. तिने त्यांच्याशी अश्लील गप्पा मारण्यास सुरुवात केली. तसेच स्क्रीनवरच ती अंगावरील कपडे उतरवू लागली. अचानक घडलेल्या या प्रकाराने ते हादरले. त्यांनी तातडीने व्हिडिओ कॉल बंद केला.

Mumbai Crime News
Rahul Narwekar News: तुमच्या गिधड धमक्यांना मी घाबरत नाही; राहुल नार्वेकरांनी विरोधकांना ठणकावलं

या प्रकारातून सावरत नाहीत तोच पुन्हा याच महिलेचा पुन्हा व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. कॉल उचलल्यानंतर तिनं पुन्हा तीच धक्कादायक कृती केली. अंगावरचे कपडे उतरवून अश्लील गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांनी घाबरून पुन्हा कॉल कट केला. त्यावर तिनं पुन्हा व्हिडिओ कॉल केला. तो उचलल्यानंतर त्यांनी तिला नाव विचारलं. त्यावर तिनं नावही सांगितलं आणि कॉल बंद केला.

ऑडिओ कॉल आला अन् पायाखालची जमीनच सरकली

या महिलेने त्यांना पुन्हा ऑडिओ कॉल केला. तुमचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं तिनं सांगितलं. त्यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. ते न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित व्यक्तीने घाबरून तिचा कॉल बंद केला. तिने वारंवार फोन केले आणि पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे दिले नाहीत.

दुसऱ्या दिवशी दुपारी १. २२ मिनिटांनी त्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज आला. त्यात मी सायबर सेलमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. तुमचे आक्षेपार्ह व्हिडिओ आम्हाला मिळाले आहेत. ते व्हायरल होऊ द्यायचे नसतील तर सिंघानिया नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधा असं मेसेजमधून सांगण्यात आलं.

तोतया पोलिसाने दिलेल्या क्रमांकावर भेदरलेल्या व्यक्तीने संपर्क साधला. त्याने व्हिडिओ हटवण्यासाठी ३१५०० रुपये मागितले. त्यांनीही जावयाकडून पैसे घेतले आणि ते समोरील व्यक्तीला दिले. यावरच तो सिंघानिया थांबला नाही. त्याने पुन्हा कॉल करून थेट ८० हजार रुपये मागितले. तुमचे आणखी व्हिडिओ असून, ते हटवतो असे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलीकडे मदत म्हणून पैसे मागितले.

हा सर्व घडलेला प्रकार नंतर त्यांनी मुलाला सांगितला. हा सेक्स्टॉर्शनचा प्रकार असल्याचं त्याच्या लक्षात आलं. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिंडोशी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Mumbai Crime News
Ajit Pawar: अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री; चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com