Ajit Pawar: अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री; चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी

राज्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलाय. पुण्याच्या पालकमंत्री पदी अजित पवार विराजमान होणार आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv
Published On

AJit Pawar Guardian Minister:

अजित पवारचं पुण्याचे दादा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चंद्रकात पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी आज जाहीर केलीय. ही यादी पाहून सरकारमध्ये अजित पवार गटाचं दबाव वाढत असल्याचं दिसतं आहे. अजित पवार गटातील सात नेत्यांना पालकमंत्री बसवण्यात आले आहे. (Latest News)

राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्री कोण? पहा यादी

  • पुणे- अजित पवार

  • अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

  • सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

  • अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

  • भंडारा- विजयकुमार गावित

  • बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

  • कोल्हापूर- हसन मुश्रीफ

  • गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

  • बीड- धनंजय मुंडे

  • परभणी- संजय बनसोडे

  • नंदूरबार- अनिल भा. पाटील

  • वर्धा - सुधीर मुनगंटीवार

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याचं दिसत होतं. आज शिंदे-फडणवीस सरकारनं त्यांची ही नाराजी दूर केलीय.परंतु त्याचवेळी अजित पवार यांचे दबाव तंत्र यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. पालकमंत्रीपद आणि रडखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारवर नाराज होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाणं गणेशोत्सवात वर्षा बंगल्यावर न जाणं या गोष्टींतून अजित पवारांची नाराजी सहज दिसून येत होती.

दरम्यान अजित पवार आपल्या गटासोबत जेव्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले, तेव्हापासून त्यांनी आपला दबदबा कायम ठेवल्याचं दिसत आहे. सत्तेत सामील होताच त्यांच्या गटातील नेत्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ टाकली. आता पुण्याच्या पालकमंत्री पदी झालेली त्यांची नियुक्ती.

शिंदे- फडणवीसांना पळवलं

सत्तेत सामील झाल्यापासून पुण्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे असावं, यासाठी अजित पवार आग्रही होते. त्यांचा हाच आग्रह त्यांच्या नाराजीचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या ७ दिवसांत पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवा, असा अल्टिमेटम अजित पवार गटाने महायुतीला दिला होता. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढवलं.

अजित पवार यांची नाराजी सरकारसाठी डोकेदुखी ठरू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं दिल्ली गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास पालकमंत्रीपदाचा तिढा या विषयावर चर्चा झाली.

Ajit Pawar
Maharashtra Politics News: राज्यातील नाराजीनाट्याचा दिल्लीत पडदा पडणार? मुख्यमंत्री शिंदे अन् फडणवीस दिल्लीत दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com