Maharashtra Politics News: राज्यातील नाराजीनाट्याचा दिल्लीत पडदा पडणार? मुख्यमंत्री शिंदे अन् फडणवीस दिल्लीत दाखल

Maharashtra Politics News: राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला पोहोचले आहेत.
Maharashtra Politics News
Maharashtra Politics NewsSaam Tv
Published On

Eknath Shinde and Fadnavis Delhi Visit :

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला पोहोचले आहेत. हे दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कृष्ण मेनन मार्ग येथील शाहांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. या भेटीत ते राज्यातील नाराजी नाट्याची चर्चा करणार आहेत, अशी सुत्रांची माहिती आहे. (Latest News)

राज्यात शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी अशा तीन पक्षाच्या चाकावर चालू असलेल्या सरकारची सत्ता गाडीत नादुरुस्ती झाल्याचं दिसत आहे. राज्यातील सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य चालू आहे. विकासकामांसाठी अजित पवारांनी शिंदे-फडणवीस इंजिनला आपलं इंजिन जोडलं. परंतु सरकारची गाडी आता गचके खात आहे.

राज्य सरकारनं दिवाळीत रेशनकार्ड धारकांना १०० रुपयात आनंदाचा शिधा देत नागरिकांची दिवाळी आनंदी केली. परंतु सरकारची दिवाळी आनंदात जाईल, असं वाटत नाही. त्याच कारण असं की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अजित पवार यांनी दांडी मारली. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चांना असून जास्त पेव फुटले आहे. गणेशोत्सवाला विविध राजकीय नेते, बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. परंतु अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावरील गणपतीचं दर्शन घेतलं नाही. तेव्हापासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यात राज्यात सुरू झालेल्या आरक्षण आंदोलनांनी सरकारचं टेन्शन वाढवलंय.

ओबीसी समाजाच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली होती. तर मुंबईतील भाजपच्या कार्यक्रमात महायुतीत आपणच बॉस असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. यामुळे सरकारमधील अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार गैरहजर राहिलेत. ते आजारी असल्याचं कारण सांगण्यात आलं. परंतु त्यांनी सायंकाळी देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती. अजित पवार ७ तारखेला होणाऱ्या जीएसटी कौन्सिल बैठकीसाठीही जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

Maharashtra Politics News
एकनाथ काका, अजित काका, देवेंद्र काका, शंभू काका आम्ही आलाे... शाळेच्या गणवेशात अवतरले RPI चे कार्यकर्ते; अनाेख्या आंदाेलनाची अख्या साता-यात चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com