Nashik News
Nashik NewsSaam tv

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Nashik News : आदिवासी परिसर असलेल्या भागात साध्या पायाभूत सुविधा आज देखील पोहचलेल्या नाहीत. यात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी निवारा शेडची उभारणी हि दूरची गोष्ट आहे.
Published on

अजय सोनवणे 

नाशिक : ग्रामीण भागात आजही सुविधांचा अभाव असल्याचे पाहण्यास मिळत आहे. प्रामुख्याने आदिवासी बहूल परिसरात हि समस्या प्रकर्षाने जाणवून येत आहे. असाच प्रकार पुन्हा एकदा नाशिकच्या आदिवासी बहुल परिसरात पाहण्यास मिळाला आहे. याठिकाणी स्मशानभूमी निवारा शेड अभावी अक्षरश: भर पावसात उघड्यावर प्लास्टिक कागदाचा आधार घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. 

नाशिकच्या आदिवासी बहुल सुरगाणा तालुक्यातील रोघांणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभूळपाडा येथील ग्रामस्थावर सदरची वेळ आली आहे. या प्रकारामुळे मरणानंतर देखील मृतदेहाची हेळसांड होत असल्याचे बोलले जात आहे. आदिवासी परिसर असलेल्या भागात साध्या पायाभूत सुविधा आज देखील पोहचलेल्या नाहीत. यात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी निवारा शेडची उभारणी हि दूरची गोष्ट आहे. 

Nashik News
Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

भरपावसात अंत्यसंस्कार 

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील जांभूळगाव येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी झाली होती. दरम्यान याच वेळी पावसाने हजेरी लावली. मात्र अशात अंत्यसंस्कार करावे लागणार होते. मात्र याठिकाणी स्मशानभूमी निवारा शेड नसल्याने नागरिकांनी प्लास्टिक पेपरचा आधार घेत अंत्यसंस्कार केले. अर्थात या प्रकारामुळे मृत्यूनंतर देखील यातना संपत नसल्याची प्रचिती आली. 

Nashik News
Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

ग्रामस्थ संतप्त 

एवढेच नाही तर रस्ता नसल्याने ओढे नाले व चिखल तुडवत मृतदेह घेऊन जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष देत नसल्याने सरण ही थकले मरण पाहुणी. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.मरणानंतरही नरक यातना भोगाव्या असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.लवकरात लवकर स्मशानभूमी शेड व रस्त्याचे काम सुरू न केल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com