पिंपरी चिंचवड : आयटी पार्क, हिंजवडीचे वॉटर पार्क, हिंजवडी झाल्यानंतर पीएमआरडीएने आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हिजवडी, माण आणि मारुंजी परिसरात नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर बांधकाम करून प्रवाह बदलणाऱ्या चार जणांविरोधात पीएमआरडीएने हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील ओढे- नाल्यांभोवती अनाधिकृतपणे बांधकाम तसेच पाण्याचा प्रवाह अडवल्यासह इतरत्र वळल्याने काही दिवसापूर्वी हिंजवडीत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या अनुषंगाने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर शुक्रवारी सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीएमआरडीए महानगरचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार संबंधितांवर ही कारवाई करण्यात आली. तसेच मारुती भागातील काही अनधिकृत बांधकामांवर देखील पीएमआरडीए बुलडोजर चालवला आहे
यांच्यावर नोंदविण्यात आले गुन्हे
हिंजवडीतील गट क्र. २६२ येथे जागा मालक पंकज साखरे, गुरुकृपा मोटर्स, महावीर कुरिअर सर्व्हिसेस, सिटी सेल, हॉटेल मयुरी (विकासक) यांनी नैसर्गिक ओढे - नाले परिसरात अनधिकृत बांधकाम केले आहे. तर हिंजवडी गट क्र. १५२, २६३ या ठिकाणी शशिकांत साखरे, शालिवाहन साखरे (जागा मालक), विठ्ठल तडकेवार, गुरुकृपा बँगल्स स्टोअर (विकासक). हिंजवडी गट क्र. २६२ या ठिकाणी पंकज साखरे (जागा मालक), सरकारमान्य ताडी विक्री केंद्र, भंगार दुकान (विकासक). हिंजवडी गट क्र. १५२, २६३ येथे शालिवाहन साखरे (जागा मालक), हिना चिकन, वाशिंग सेंटर यांनी ओढे - नाल्यावर अनाधिकृतपणे बांधकाम केल्याचे समोर आले. यामुळे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले.
त्या बांधकामावर चालविला बुलडोजर
दरम्यान मारुंजी भागातील अनधिकृत बांधकाम आणि इमारतींवर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभाग निष्कासन कारवाई करत आहे. यात मारुंजी गट क्र. ४५/१/२ येथील परिहार यांची जी+ ८, भिसेन यांची जी+ ४, चाकले यांची जी+२ या अनधिकृत बांधकामाचे निष्कासण पूर्ण झाले आहे. तर चौधरी यांची जी+५ या बांधकाम असणाऱ्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. यासह डॉ. खेनट यांच्या जी+५ या इमारतीचे स्ट्रक्चर पाडण्याची कारवाई सुरू असताना न्यायालयाच्या आदेशाने संबंधित कारवाई थांबवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.