Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Navi Mumbai News : कंपनीमध्ये कामावर गेले असताना रात्री दहा वाजेला काम आटोपून घरी अंबरनाथ येथे जाण्यासाठी त्यांनी ओला अ‍ॅपद्वारे कार बुक केली होती. गाडी आल्यानंतर तिघांनीही प्रवास सुरू केला
Navi Mumbai Crime
Navi Mumbai CrimeSaam tv
Published On

विकास मिरगणे 
नवी मुंबई
: रबाळे एमआयडीसी परिसरात रात्रीच्या सुमारास हल्ल्याची घटना घडली असून दहा अनोळखी इसमांनी मिळून कंपनीतून परतणाऱ्या तीन कामगारांवर लाकडी बांबू व स्टील रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तिघेही कामगार गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईच्या रबाळे परिसरात असलेल्या सुझलर कंपनीत तिघेजण काम करतात. हे तिघेही सुलझर कंपनीमध्ये कामावर गेले असताना रात्री दहा वाजेला काम आटोपून घरी अंबरनाथ येथे जाण्यासाठी त्यांनी ओला अ‍ॅपद्वारे कार बुक केली होती. गाडी आल्यानंतर तिघांनीही प्रवास सुरू केला. मात्र काही अंतरावर रबाळे एमआयडीसी ते महापे रोडच्या दरम्यान मुंब्रा देवी ब्रिजजवळ अचानक दहा अनोळखी इसमांनी कार अडवत हल्ला केला. 

Navi Mumbai Crime
Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर


धमकी देत केली मारहाण 
दरम्यान या तिघांना कार थांबताच संशयितांनी कार बाहेर बोलावून त्यांना धमकावले. इकडे कामाला यायचं नाही. आजच्या आज निघून जायचं; अशा शब्दांत या तिघांनाही धमकी दिली. त्यानंतर या दहा जणांनी तिघांवर हल्ला चढवला. लाकडी बांबू, स्टील रॉड आणि हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 

Navi Mumbai Crime
Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

सोन्याची चैन गहाळ
दरम्यान या हल्ल्यात रिझवान अहमद यांच्या दोन्ही पायांना आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. तर अंकित यादव यांच्या दोन्ही पायांवर गंभीर इजा झाली असून तिसऱ्या कामगाराच्या हाताला दुखापत झाली आहे. दरम्यान या हल्ल्यात त्यांची सोन्याची चैन देखील गहाळ झाली आहे. या प्रकरणी तिघांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com