Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Jalgaon Yawal News : इंदोर येथून खासगी बस भुसावळ कडे येत होती. फैजपूर- आमोदा दरम्यान असलेल्या मोर नदीवरील पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून कोसळली
Bus Accident
Bus AccidentSaam tv
Published On

यावल (जळगाव) : प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावर मोर नदीच्या पुलाजवळ इंदोरकडून भुसावळकडे येणारी खासगी ट्रॅव्हल्स नदीवरील पुलावरून १५ फूट खोल नदीपात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात हा भीषण अपघात सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे. दरम्यान इंदोर येथून खासगी बस भुसावळ कडे येत होती. फैजपूर- आमोदा दरम्यान असलेल्या मोर नदीवरील पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस पुलाचा कठडा तोडून थेट १५ फूट खोल असलेल्या नदीमध्ये कोसळली. नदीला पाणी नाही. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 

Bus Accident
Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

दोघांचा मृत्यू 

दरम्यान खासगी बस नदीच्या पुलावरून खाली कोसळल्याने बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य २५ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. बस नदीत कोसळल्याची माहिती मिळताच गावातील नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास सुरवात केली. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढत त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bus Accident
Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

माथेरान घाटात अपघात, चार प्रवाशी थोडक्यात बचावले.
विकेंड सुट्टीचा दिवस असल्याने माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची रीघ लागलेली आहे. दरम्यान माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला घाटात अपघात झाला. गुजरात राज्याची पासिंग असलेल्या कारला अपघात घडला. यात चार प्रवाशी पर्यटक यामध्ये प्रवास करीत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. माथेरान घाटातील जुमापट्टी या रेल्वे स्थानकाच्या वरील वळणार अपघात घडला असून वाहन रस्त्याच्या कडेला असणारी सुरक्षा रेलिंग तोडून थेट खड्ड्यात जाऊन उलटली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नसून प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com