Chhagan Bhujbal News: मराठा आरक्षणावरुन छगन भुजबळ यांना दुसरा धक्का; नाशिकमधील बड्या नेत्याने सोडली साथ

Chhagan Bhujbal On Maratha Aarkshan: मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नये... अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal NewsSaamtv
Published On: 

अजय सोनवणे, प्रतिनिधी

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा आमरणाला उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाचा ओबीसीत समाजात समावेश करुन आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. भुजबळांच्या या भूमिकेने नाराज झालेल्या बड्या पदाधिकाऱ्याने त्यांची साथ सोडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नये, आमचा त्याला विरोध राहील, अशी भूमिका छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतली आहे.

त्यांच्या या भूमिकेमुळे नाराज होऊन माजी आमदार आणि मनमाड बाजार समितीचे सभापती संजय पवार (Sanjay Pawar) यांनी मंत्री भुजबळांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संजय पवार यांनी सभापती पदाचा राजीनामा देत छगन भुजबळांना मोठा धक्का दिला आहे.

Chhagan Bhujbal News
Hingoli News: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करतोय, चिठ्ठी लिहून ठेवत तरुणाने संपवलं जीवन

दरम्यान, मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्याने छगन भुजबळांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. याआधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनीही भुजबळांची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. जयदत्त होळकर यांच्या पाठोपाठ संजय पवार यांनी भुजबळांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

Chhagan Bhujbal News
Baba Maharaj Satarkar Passed Away : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.