Baba Maharaj Satarkar Passed Away : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Baba Maharaj Satarkar News : शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Baba Maharaj Satarkar
Baba Maharaj SatarkarSaam TV
Published On

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं ८९ व्या वर्षी निधन झालं आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी ३ वाजेनंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येईल. उद्या म्हणजेच शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'ज्येष्ठ निरुपणकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत मालवली ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखदायक आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती होती.' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'बाबा महाराज सातारकर यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाचा वाटा मोलाचा होता. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केले. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं वैशिष्ट्य. ज्यांच्या कीर्तनाची ख्याती राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात होती अशा थोर बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!!'

Baba Maharaj Satarkar
Ravikant Tupkar News : मंत्र्यांना विमा कंपन्यांकडून पैसे जातात; रवीकांत तुपकरांचा माेदी सरकारवर गंभीर आराेप
Baba Maharaj Satarkar
Maharashtra Political News : मराठा आरक्षणाच्या पेचामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला?, शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय झालं?

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातार्‍यामध्ये झाला होता. बाबा महाराज सातारकर यांनी इंग्रजी माध्यमातून एस एस सीपर्यंतचे शिक्षण घेतले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून बाबा महाराजच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. त्यांच्या कुळामध्ये 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com