Maharashtra Political News : मराठा आरक्षणाच्या पेचामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला?, शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय झालं?

CM Eknath Shinde-Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion Date
Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion DateSaam TV
Published On

सुनील काळे

Mumbai News :

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुपारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. राज्यातील मराठा आरक्षण, मंत्रिमंडळ विस्तार, अपात्रता सुनवणी अशा विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर शिंदे, फडणवीस दिल्लीत गेल्याची कालपासूनच चर्चा होती. (Latest Marathi News)

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. या दिल्ली दौऱ्यात शिंदे-फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion Date
Gunratna Sadavarte : हेच का तुमचं शांततामय आंदोलन?, मनोज जरांगेंना तातडीने अटक करा; तोडफोडीच्या घटनेनंतर गुणरत्न सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या पेचामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणामुळे राज्यातील वातावरण तापलं असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून रेड सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion Date
Lalit Patil Case: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट, पुण्यातील नामांकित शाळेच्या संचालकाला अटक

अजित पवार गटाटा गृहनिर्माण खात्यावर डोळा

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटालाही महत्वाची मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडे असणाऱ्या गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा डोळा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गृहनिर्माण खात्यासाठी अजित पवार गट आग्रही आहे. त्यामुळे आगामी विस्तारात गृहनिर्माण खातं अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com