Hingoli News: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करतोय, चिठ्ठी लिहून ठेवत तरुणाने संपवलं जीवन

Hingoli Maratha Aarakshan News: नवनाथ उर्फ कृष्णा कल्याणकर असं मृत तरुणाचं नाव आहे. नवनाथ हा हिंगोलीच्या देवजना गावातील रहिवासी होता.
Hingoli News another young man ended his life for maratha reservation
Hingoli News another young man ended his life for maratha reservation Saam TV
Published On

Hingoli Maratha Aarakshan News

मराठा आरक्षणासाठी सुनील कावळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, दुसरीकडे हिंगोलीत देखील अशीच घटना घडली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे.

नवनाथ उर्फ कृष्णा कल्याणकर असं मृत तरुणाचं नाव आहे. नवनाथ हा हिंगोलीच्या देवजना गावातील रहिवासी होता. त्याने बाळापूर आखाडा शिवारात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hingoli News another young man ended his life for maratha reservation
Sanjay Gaikwad: गाडी फोडण्याची शिक्षा कमीच, गुणरत्न सदावर्तेंना... शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक वक्तव्य

दरम्यान, नवनाथने मराठा आरक्षणासाठीच  (Maratha reservation) आत्महत्या केली, असा दावा गावकऱ्यांकडून केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ कल्याणकर हा सोयाबीन काढण्यासाठी शेतात मळणी यंत्र घेऊन गेला होता. मजुरांना मळणी यंत्र सुरू करून दिल्यानंतर त्यान जवळच असलेल्या झाडाला गळफास घेतला.

आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करीत आहे, असं नवनाथने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, नवनाथच्या आत्महत्येची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटला असतानाच आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या ७ दिवसांत ५ मराठा तरुणांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, साम टीव्हीकडून मराठा समाजाला आवाहन करण्यात येतंय, की नैराश्यपोटी असं टोकाचं पाऊल उचलू नका, भविष्यात मराठा आरक्षण मिळालं, तर त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नसाल. तेव्हा कुठलाही अविचार न करता, शांततेत आपला लढा सुरू ठेवा.

Hingoli News another young man ended his life for maratha reservation
Manoj Jarange Patil: आम्हाला हलक्यात घेऊ नका, गुणरत्न सदावर्तेंच्या आरोपानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com