

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीसाठी नाशिकचा निकाल सर्वात धक्कादायक ठरलाय. राज्यात 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेले असताना दुसरीकडे नाशिकमध्ये महायुतीचा गेम फिरलाय.भाजप बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंनी याठिकाणी बाजी मारली. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार असणाऱ्या शिंदेसेनेच्या नरेंद्र दराडेंचा पराभव झाला.
नाशिकमध्ये विधानपरिषदेसाठी 619 मतदार होते. त्याती 618 मतदारांनी मतदानं केलं असून 13 मतं अवैध ठरलेत. त्यात गोकुळ गितेंना 357 तर नरेंद्र दराडेंना 248 मतं मिळालेत. मात्र दरांडेंनी नाशिकमधील हा पराभव पचवण्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दराडेंना शिंदेसेनेत येण्याची ऑफर दिली. गोकुळ गितेंनी शिंदेसेनेत पक्षप्रवेश केला. त्यामुळे निकालानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांनी गद्दारी केल्याचा आरोप किशोर दराडेंनी केलाय.. तर दुसरीकडे गिरीश महाजनांनीच गितेंना ताकद दिल्याचा आरोप नरेंद्र दराडेंनी दिलीय.
दरम्यान गोकुळ गितेंच्या विजयानंतर मंत्री उदय सामंतांसोबत थेट पक्षप्रवेशासाठी वाय बी सेंटरवर पोहचले.विधानपरिषदेच्या निकालानंतर आमदार किशोर दराडेंनी महायुतीतील अंतर्गत वादावर बोटं ठेवलयं. महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांमुळे नरेंद्र दराडेंचा पराभव झाल्याचा आरोप किशोर दरांडेंनी केलयं. मात्र दराडेंच्या पराभवाला जबाबदार असलेले तीन नेते कोण हे किशोर दराडेंनी जाहीर करावं? असा सवाल मंत्री उदय सामंतांनी उपस्थित केलाय.. तर हा निकाल आमच्यासाठीही अत्यंत धक्कादायक आहे, असं म्हणत चौकशी करू अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिलीय.
मुळात विधानपरिषदेची निवडणुक जाहीर होताच नाशिकमधील उमेदवारीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. नाशिकमधून भाजपचे गणेश गीते आणि शिंदेसेनेचे नरेंद्र दराडे इच्छुक होते. मात्र ऐनवेळी शिंदेसेनेच्या दराडेंना उमेदवारी देण्यात आल्यानं गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीतेंनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर भाजपच्या गणेश गीतेंनी माघार घेतली. तर बाप काढला म्हणून गोकुळ गितेंनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांनी गितेंच्या घरी जाऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही महायुतीतील ही बंड़खोर रोखण्यात मंत्र्यांना यश आलं नाही.अखेर बंडखोर उमेदवार गोकुळ गितेंनी विजयानंतर वैयक्तिक पातळीवरील टीकेचा आणि कौटुंबिक अपमानाचा जाहीर समाचार घेतलाय.
नाशिक विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर होताच हायव्होल्ट्रेज ड्रामा रंगला होता. तो निवडणुकीच्या निकालानंतरही कायम राहिलाय. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या गोकुळ गीतेंना नेमकं कुणी पाठबळ दिलं? दराडेंविरोधात प्रचार थांबवूनही गोकुळ गीतेंना मतदारांनी पाठिंबा कसा दिला? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताय. मात्र नाशिकमध्ये नरेंद्र दराडेंसह महायुतीचा गेम फिरलाय. हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.