Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

BJP rebel Gokul Gite wins Nashik MLC election: नाशिक विधान परिषद निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. या निवडणुकीत एकनाथ शिंदेना मोठा धक्का बसला.
Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप
Nashik Vidhan Parishad ResultSaam tv
Published On
  • नाशिक विधान परिषद निवडणुकीत धक्कादायक निकाल

  • भाजप बंडखोर गोकुळ गीते यांचा विजय

  • गोकुळ गीतेंकडून शिंदेसेनेचे नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव

  • दराडेंचा महायुतीवर दगाफटक्याचा आरोप

नाशिक विधान परिषद निवडणुकीत नाशिकमधून धक्कादायक निकाल समोर आला आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा भाजपचे बंडखोर उमदवार गोकुळ गीते यांनी दारुण पराभव केला. गोकुळ गीते यांना ३८९ मतं मिळाली. गोकुळ गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. या विजयानंतर गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या निवडणुकीत शिंदेसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजपचे बंडखोर गोकुळ गीते आणि त्यांचे बंधू गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटपर्यंत या दोघांची समजूत काढण्यात आली. अखेर गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता पण गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. एकनाथ शिंदे यांनी देखील स्वत: गोकुळ गीते यांच्यासोबत चर्चा केली होती तरी देखील त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. या निवडणुकीत गोकुळ गीते यांचाच विजय झाला. विजयानंतर गीतेंच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप
Poilitical Crisis News : पक्ष कार्यालय अजित पवार गटाचच Hasan Mushrif यांचे विधान

गोकुळ गीते यांच्या विजयानंतर नरेंद्र दराडे यांनी संताप व्यक्त करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. महायुतीतील सर्व नेत्यांनी आपला घात केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, 'एकनाथ शिंदे सोडून सर्वांनीच माझा घात केला.' यावेळी संतप्त झालेल्या नरेंद्र दराडे यांनी जल्लोष करणाऱ्या गोकुळ गीतेच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर एकच गोंधळ उडाला.

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे ६ बंडखोर खासदार अडचणीत येणार; उद्धव ठाकरे टाकणार अखेरचा डाव, काय आहे प्लॅन?

नाशिकमधील पराभवावर एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महायुती धर्माचे पालन का झालं नाही? असं म्हणत त्यांनी नाराज व्यक्त केली. नाशिकमधले पदाधिकारी आणि उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांनी पराभव का झाला याची माहिती मागवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विजयी उमेदवार गोकुळ गीते यांना मुंबईला बोलावण्यात आले आहे. मंत्री उदय सामंत यांनी फोन करून गोकुळ गीते यांना मुंबईला बोलावलं. विशेष विमानाने त्यांना नाशिकहून मुंबईला बोलावण्यात आले.

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप
Politics : मुख्यमंत्री बदलणार का? काँग्रेस अध्यक्षांचा ऑन द स्पॉट फैसला, राजकीय वर्तुळातील वावटळ शांत

दरम्यान, महायूतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. महायुतीमध्ये तिन्ही पक्षांनी दगा फटका केला असा गंभीर आरोप दराडे यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंकडे किशोर जराडे सर्व कैफियत मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप
Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com