Nashik : धक्कादायक! नामांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

Nashik News : मनमाडमधील एका नामांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून नाशिकच्या गणेश गायकवाड या ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. उपचारासाठी नेताना वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याची माहिती समोर आली असून पोलिस तपास सुरू आहे.
MANMAD HOTEL SWIMMING POOL ACCIDENT: NASHIK YOUTH GANESH GAIKWAD DIES AFTER DROWNING
MANMAD HOTEL SWIMMING POOL ACCIDENT: NASHIK YOUTH GANESH GAIKWAD DIES AFTER DROWNINGSaam Tv
Published On
Summary
  • मनमाडमधील हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून ३० वर्षीय गणेश गायकवाडचा मृत्यू

  • गणेश नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी मनमाडमध्ये आला होता

  • उपचारासाठी नेताना महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात पोचायला उशीर

  • पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे

नाशिकच्या मनमाडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका नामंकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गणेश गायकवाड असे मृत तरुणाचे नाव असून तो नाशिक येथील रहिवासी होता. नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी तो काही दिवसांपूर्वी शहरात आला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड हा शहरालगतच्या एका हॉटेलमध्ये लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त गेला होता. काल सायंकाळच्या सुमारास गणेश आणि त्याचा एक मित्र हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही वेळातच गणेश अचानक बुडू लागल्याचे मित्रांच्या लक्षात आले.

MANMAD HOTEL SWIMMING POOL ACCIDENT: NASHIK YOUTH GANESH GAIKWAD DIES AFTER DROWNING
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

घाबरलेल्या मित्राने तत्काळ आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली. उपस्थितांनी गणेशला तातडीने पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला सीपीआर देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. काही वेळाने त्याला तातडीने कारमधून रुग्णालयात नेण्यात आल. मात्र त्याचवेळी शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रुग्णवाहिका किंवा वाहन वेगाने पुढे जाऊ शकत नव्हते.

MANMAD HOTEL SWIMMING POOL ACCIDENT: NASHIK YOUTH GANESH GAIKWAD DIES AFTER DROWNING
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत काही तरुणांनी गणेशला खांद्यावर उचलून रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित गणेशचे प्राण वाचले असते, अशी भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. गणेशच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com