Nashik News : नाशकात कारखान्यावर हल्ला... औद्योगिक संघटना आक्रमक, शुक्रवारी उद्योग बंदचा निर्धार

आमदार सीमा हिरे यांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करु असे निमाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले हाेते.
Nashik MIDC News, NIMA,
Nashik MIDC News, NIMA, saam tv
Published On: 

Nashik News : निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे (Dhananjay Bele) यांच्या कारखान्यावरील हल्ल्याप्रकरणी संशयितांना गुरुवारपर्यंत अटक करावी अशी मागणी औद्योगिक संघटनांनी (Nashik Industries & Manufacturer's Association) प्रशासनास केली आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास नाशिक शहरातील औद्योगिक संघटनांनी शुक्रवारी उद्योग बंद ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

Nashik MIDC News, NIMA,
AAP Swarajya Yatra : कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे आम आदमी पार्टी फुंकणार रणशिंग; उद्या 'आप'ची स्वराज्य यात्रा काेल्हापूरात

नाशिक शहरात निमा पाॅवर 2023 इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमावेळी आमदार सीमा हिरे (mla seema hire) यांना धक्का लागल्याने त्या खाली पडल्या हाेत्या. मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री दादा भुसे हे देखील कार्यक्रमास उपस्थित हाेते.

आमदार सीमा हिरे या खाली पडल्यानंतर त्यांची विचारपूस देखील करण्यात आली नाही असा आराेप भाजपाकडून केला गेला. आमच्यामुळे तुम्ही मंत्री आहात हे विसरू नका असे भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी फेसबुकवर पोस्ट केली हाेती.

Nashik MIDC News, NIMA,
Shivrajyabhishek Sohala : राष्ट्रवादी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करणार शिवराज्याभिषेक साेहळा : जयंत पाटील (पाहा व्हिडिओ)

या कार्यक्रमाचे आयोजक आणि निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यावर देखील सोशल मीडियावरून टीका करण्यात आली हाेती. मात्र हा सर्व गैरसमज असून आमदार सीमा हिरे या एका व्यक्तीच्या धक्क्याने खाली पडल्या. आमदार सीमा हिरे यांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करु असे निमाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले हाेते.

Nashik MIDC News, NIMA,
Mumbai Goa Highway News : वाहतुकदारांनाे ! मुंबई गोवा महामार्गावर चार दिवस अवजड वाहनांना बंदी; जाणून घ्या कारण

दरम्यान निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कारखान्यावर अज्ञातांनी हल्ला केला. त्यामुळे उद्योजक आता आक्रमक झालेत. गुरुवारपर्यंत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी उद्याेजक संघटनांनी केली आहे. अन्यथा शुक्रवारी उद्याेग बंद ठेवण्याचा इशारा देखील संघटनेने दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.