Nashik-Gujrat Highway : नाशिक-गुजरात महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटरपर्यंत रांगा

Nashik Gujarat Highway Traffic Jam : नाशिक-गुजरात महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी पहाटेपासूनच महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
नाशिक-गुजरात महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटरपर्यंत रांगा
Nashik Gujarat Highway Traffic JamSaam TV

नाशिक-गुजरात महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी पहाटेपासूनच महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांसह वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांकडून सध्या वाहतूक कोंडीचे प्रयत्न सुरू आहे. सध्या पेठ रोडच्या काँक्रीटीकरणाचं काम सुरू आहे.

नाशिक-गुजरात महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटरपर्यंत रांगा
Mumbai Local Train : मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक आज दुपारी संपणार, पण लोकल ट्रेन 'या' स्थानकांपर्यंतच धावणार

त्यामुळे नाशिक-गुजरात महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. शनिवारी रात्री देखील मालेगाव जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता. या अपघामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

आता रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा नाशिक-गुजरात महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. त्यामुळे भल्यापहाटे गावी निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

सध्या नाशिकहून पेठ मार्गे गुजरातकडे जाणारी आणि येणारी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प आहे. पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानं वाहनचालकांसह प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर संथ गतीने वाहतूक

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुन्या पुणे महामार्गावर खंडाळा घाट परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. शाळांच्या सुट्ट्या संपल्यामुळे अनेकजण शहरात परतत आहेत. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

लोणावळा, खंडाळा आणि भोर घाट विभागात शनिवारी दुपारी मोठ्या प्रमाणात लहान वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाल्याचे महामार्ग पेट्रोलिंग अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी, पोलिसांनी 10 मिनिटांचा ब्लॉक सुरू केला, पण जाम सुरूच होता.

नाशिक-गुजरात महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटरपर्यंत रांगा
Maharashtra Rain Alert : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता; वाचा कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com