Mumbai Local Train : मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक आज दुपारी संपणार, पण लोकल ट्रेन 'या' स्थानकांपर्यंतच धावणार

Mumbai Local Train News Today : मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. मध्य रेल्वेच्या वतीने घेण्यात आलेला ६३ तासांचा जम्बोब्लॉक आज संपणार आहे.
मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक आज दुपारी संपणार, पण लोकल ट्रेन 'या' स्थानकांपर्यंतच धावणार
Mumbai Local Train News TodaySaam TV

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. मध्य रेल्वेवर घेण्यातआलेला ६३ तासांचा जम्बोब्लॉक आज म्हणजेच रविवारी दुपारपर्यंतच संपणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, जम्बोब्लॉक संपल्यानंतरही लोकल ट्रेन भायखळा आणि वडाळा स्टेशनपर्यंतच धावणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक आज दुपारी संपणार, पण लोकल ट्रेन 'या' स्थानकांपर्यंतच धावणार
Central Railway Megablock: जम्बो मेगाब्लॉकमुळं प्रवाशांचे 'मेगा'हाल; धडकी भरवणारा रेल्वे स्थानकावरचा तुडुंब गर्दीचा VIDEO

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) आणि ठाणे स्थानकांतील अत्यावश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यासाठी ठाण्यात ६३ तास आणि सीएसएमटी येथे ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान अनेक लोकल ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.

रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर कामे आटोपून लोकलसेवा सुरळीत करावी, अशी विनंती प्रवासी करत आहेत. प्रवाशांची तारांबळ बघता प्रशासनाने देखील ब्लॉककाळात नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. सीएसएमटी आणि ठाणे स्टेशनवरील सुरू असलेली कामे जवळपास पूर्ण होत आली आहे.

त्यामुळे सीएसएमटी येथील ३६ तासांचा ब्लॉक आज रविवारी दुपारी १२.३० वाजता संपणार आहे. तर ठाणे येथील ६३ तासांचा ब्लॉक आज दुपारी ३.३० वाजता संपणार आहे. मात्र, सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे आजही लोकल भायखळा, परळ, दादर आणि वडाळ्यापर्यंत धावणार आहेत.

त्यामुळे रविवारी देखील मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. रविवारी लोकल ट्रेनच्या २३५ फेऱ्या आणि २७० लोकल अंशत: रद्द असतील. त्याचप्रमाणे ३१ रेल्वेगाड्या रद्द आणि ८० रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक आज दुपारी संपणार, पण लोकल ट्रेन 'या' स्थानकांपर्यंतच धावणार
Maharashtra Rain Alert : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता; वाचा कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com