Central Railway Megablock: जम्बो मेगाब्लॉकमुळं प्रवाशांचे 'मेगा'हाल; धडकी भरवणारा रेल्वे स्थानकावरचा तुडुंब गर्दीचा VIDEO

Passanger Crowd On Mumbai Railway Station Video: आज मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय.
 मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा दुसरा दिवस
Central Railway MegablockSaam Tv

मध्य रेल्वेच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय. सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सर्व लोकल या भायखळा स्थानकावरून सुटत आहेत. यामुळे भायखळा स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळतेय. जम्बो मेगाब्लॉकमुळं प्रवाशांचे 'मेगा'हाल होत असल्याचं समोर आलं आहे. धडकी भरवणारा रेल्वे स्थानकावरचा तुडुंब गर्दीचा व्हिडिओ देखील समोर आलाय.

मेगाब्लॉकचा (Central Railway Megablock) आजचा दुसरा दिवस आहे. वडाळा रेल्वेस्थानकाबाहेर प्रवाशांची तोबा गर्दी दिसुन येत आहे. मिळेल ते वाहन पकडून नागरिक आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना दिसून येत आहेत.गर्दीमुळे रेल्वेस्थानकांबाहेर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाली आहे. पोलिसांकडुन ट्राफिक कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिवा स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. दिवा स्थानकावर प्रवाशांची झुंबड पाहायला मिळतेय. दरम्यान प्रवाशांनी लोकलचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केल्याचं देखील समोर आलं (Railway Station Video) आहे.

सलग दुसऱ्या दिवशी रेल्वेप्रवाशांची कसोटी दिसुन येत आहे. मेगाब्लॉकमुळे ५३४ लोकलफेऱ्या रद्द केल्या आहेत. याचा प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. मध्य रेल्वेच्या ब्लॉकच्या पहिल्या दिवशी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच ठाणे रेल्वे स्थानकातील रुळ हलवण्याचे (Mumbai Local News) काम युद्धपातळीवर करण्यात आलं आहे.

आता फलाट पाचचे रुंदीकरण सुरू झाले असून शनिवारी सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रविवारी शेवटच्या टप्प्यातील कामांनंतर हा फलाट प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

 मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा दुसरा दिवस
Mumbai News: जम्बो मेगाब्लॉकचा फटका! पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; मुलुंड ते भांडूपपर्यंत वाहनांच्या रांगा

ब्लॉकमुळे लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मुंबईकरांनी महत्त्वाच्या कामाशिवाय लोकलने प्रवास करू नये, असं मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आवाहन करण्यात आलं आहे. रेल्वे रुळाच्या आणि टर्मिनलच्या (Passanger Crowd On Railway Station) कामाच्या विस्तारीकरणासाठी दोन दिवस पुणे मुंबई रेल्वे गाड्या राहणार बंद राहणार आहेत. पुणे मुंबई दरम्यान दररोज अनेक रेल्वे धावतात.

त्यात साधारण २९ गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. मुंबई-पुणे दरम्यान दररोज धावणारी इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द करण्यात आलेली आहे. रेल्वेच्या आणि टर्मिनलच्या कामामुळे येत्या १ आणि २ जून रोजी गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. प्रगती एक्सप्रेसही रद्द करण्यात आलेली आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेली आहे.

 मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा दुसरा दिवस
Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल; रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com