Ashok Kharat: तू दिसायला सुंदर तरी..., अशोक खरात महिलांचं माइंड रिडिंग कसा करायचा? हादरवणारी माहिती आली समोर

Ashok Kharat Mind Reading Scam: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा समोर आला आहे. अशोक खरात माइंड रिडिंग कसा करायचा आणि महिलांची फसवणूक करायचा. मी देवाचा अवतार, तुम्ही खास आहात, असं तो महिलांना म्हणायचा.
Ashok Kharat: तू दिसायला सुंदर तरी..., अशोक खरात माइंड रिडिंग कसा करायचा? हादरवणारी माहिती आली समोर
Ashok Kharat saam tv
Published On

Summary -

  • माइंड रीडिंगच्या नावाखाली फसवणूक

  • भावनिक जाळं विणून विश्वास संपादन करायचा

  • एसआयटीकडून तपास सुरू

  • न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहे. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. या भोंदूबाबाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. अशात या भोंदूबाबाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. भोंदूबाबा अशोक खरात माइंड रीडिंगच्या नावाखाली महिलांच्या भावनिक आणि मानसिकतेचा फायदा घेत त्यांची फसवणूक करायचा.

भोंदू खरात महिलांना माइंड रीडिंगमध्ये तरबेज असल्याचा दावा करत असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले. महिलांना लक्ष्य करत मानसशास्त्रीय पद्धतीने तो विश्वास संपादन करत होता.तू दिसायला सुंदर आहेस... तुझा पती तुला समजून घेत नाही… तुझी क्षमता कोणी ओळखत नाही… अशा स्तुतीपर बोलांनी तो महिलांना भुरळ घालत असल्याचा आरोप आहे. आशीर्वादाच्या नावे ऊर्जा हस्तांतरण अध्यात्मिक उपचाराच्या नावाखाली महिलांचं संमोहन करायचा.

Ashok Kharat: तू दिसायला सुंदर तरी..., अशोक खरात माइंड रिडिंग कसा करायचा? हादरवणारी माहिती आली समोर
Ashok Kharat Case: 40 आमदारांचा अलिबाबा कोण? खरातच्या दरबारी आमदारांचा राबता?

मी देवाचा अवतार, तुम्ही खास आहात...भावनिक जाळं विणून महिलांचा विश्वास संपादन केलं, अशी चौकशीत अशोक खरातने कबुली दिल्याची माहिती उघड झाली. पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या भावना ओळखून त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न भोंदूबाबा करत होता. तर आतापर्यंत त्याने किती महिलांचे शोषण केले? हे भोंदू खरातला सांगता येईना अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या पोलिस खरातची कसून चौकशी करत आहे.

Ashok Kharat: तू दिसायला सुंदर तरी..., अशोक खरात माइंड रिडिंग कसा करायचा? हादरवणारी माहिती आली समोर
Ashok Kharat Case: आता खरातला EDचा दणका बसणार? खरातचं 'हवाला' कनेक्शन उघड?

दरम्यान, भोंदू अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशोक खरातची आज पोलिस कोठडी संपत असल्यानं न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आतापर्यंत अशोक खरातवर लैंगिक छळ आणि फसवणुकीचे १० गुन्हे दाखल झाले आहेत. १० पैकी ८ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे तर २ गुन्हे फसवणुकीचे आहेत. नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी SIT कडून खरातला पुन्हा पोलिस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. आज नाशिक जिल्हा न्यायालय काय निर्णय देतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ashok Kharat: तू दिसायला सुंदर तरी..., अशोक खरात माइंड रिडिंग कसा करायचा? हादरवणारी माहिती आली समोर
Ashok Kharat Video Viral: काचेच्या केबिनमधील अशोक खरातचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल कसे झाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com