Ashok Kharat: मी कोणत्या महिलेवर जबरदस्ती केली नाही..., अशोक खरातच्या उलट्या बोंबा; पोलिस कोठडीत मंत्रांचा जप सुरू

Ashok Kharat Denies Allegations: नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अशोक खरातने चौकशीदरम्यान मी कोणत्या महिलेवर जबरदस्ती केली नाही, तो विधीचा भाग होता असे सांगितले. अशोक खरातचा सध्या पोलिस कोठडीत मंत्रांचा जप सुरू आहे.
Ashok Kharat: मी कोणत्या महिलेवर जबरदस्ती केली नाही..., अशोक खरातच्या उलट्या बोंबा; पोलिस कोठडीत मंत्रांचा जप सुरू
Ashok Kharatsaam tv
Published On

Summary -

  • अशोक खरातने पोलिस कोठडीत मोठा दावा केला

  • अशोक खरातने त्याच्यावर केलेले आरोप फेटाळले

  • मी कोणत्या महिलेवर जबरदस्ती केली नाही, असे तो म्हणाला

  • पोलिस कोठडीत मंत्रजप सुरू आहे

१०० पेक्षा अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाब अशोक खरातच्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे राजकारणही ढवळून निघाले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकापोठापाठ एका राजकीय व्यक्तीचे कनेक्शन समोर येऊ लागले आहे. एकीकडे या प्रकरणामुळे राजकारण तापले असतान एसआयटीसमोर अशोक खरातने नेमकी काय माहिती दिली ती समोर आली आहे. मी कोणत्याही महिलेवर जबरदस्ती केली नाही असे अशोक खरात म्हणाला.

पोलिस कोठडीत अशोक खरातकडून मंत्रांचा जप सुरू आहे. मी काही केलचं नाही अशा त्याच्या बोंबा सुरू आहेत. 'माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले. महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग आहे. मी कुणावरही जबरदस्ती केली नाही. यापुढे मी माझ्या मेंदूचेच ऐकणार.', असे अशोक खरातने पोलिस तपासात सांगितले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अशोक खरातचा सध्या पोलिस कोठडीत मंत्रजप सुरू आहे.

Ashok Kharat: मी कोणत्या महिलेवर जबरदस्ती केली नाही..., अशोक खरातच्या उलट्या बोंबा; पोलिस कोठडीत मंत्रांचा जप सुरू
Ashok Kharat: अशोक खरात खायचा शक्तिवर्धक गोळ्या, अतिसेवनामुळे अर्धांगवायूचा झटका; तपासातून धक्कादायक माहिती उघड

अशोक खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे अनेक केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. अशोक खरात आता ईडी, फॉरेक्स आणि कस्टमच्या रडारवर आहे. कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्रे ईडीकडे पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी केली जाणार आहे. २१ देशांतील दौऱ्यांचा खर्च कसा करण्यात आला याचा तपास केला जात आहे. तुर्कस्थानासह विदेशातून आणलेल्या साहित्यावर कस्टम ड्युटी भरली का? याची चौकशी सुरू आहे. नाशिक-नगरमध्ये अशोक खरातची तब्बल ५२ मालमत्तांची माहिती समोर आली आहे. त्याने महिलांना फसवण्यासाठी वापरलेले बनावट खडे, रत्न, मध विक्रीतून कमावलेला पैसा तपासाच्या कक्षेत आहे.

Ashok Kharat: मी कोणत्या महिलेवर जबरदस्ती केली नाही..., अशोक खरातच्या उलट्या बोंबा; पोलिस कोठडीत मंत्रांचा जप सुरू
Ashok Kharat : महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची करण्यात आली HIV टेस्ट, काय आला रिपोर्ट?

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरात शक्तिवर्धक गोळ्या घेत होता. या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचे तपासातून उघड झाले आहे. त्याच्यावर नाशिक शहरातील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. ज्या डॉक्टरने त्याचा जीव वाचवला होता तो डॉक्टर देखील त्याचा भक्त होता. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यामुळे पोलिस कोठडीत असलेल्या अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली. पण रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

Ashok Kharat: मी कोणत्या महिलेवर जबरदस्ती केली नाही..., अशोक खरातच्या उलट्या बोंबा; पोलिस कोठडीत मंत्रांचा जप सुरू
Ashok Kharat: हेमंत गोडसेंचा भोंदूबाबा खरातसोबतचा VIDEO समोर, लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com