Ashok Kharat: अशोक खरात खायचा शक्तिवर्धक गोळ्या, अतिसेवनामुळे अर्धांगवायूचा झटका; तपासातून धक्कादायक माहिती उघड

Nashik Fake Godman Ashok Kharat Case: नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणारा अशोक खरात शक्तिवर्धक औषधं घ्यायचा.
Ashok Kharat: अशोक खरात घ्यायचा शक्तिवर्धक औषधं, अतिसेवनामुळे अर्धांगवायूचा झटका; तपासातून धक्कादायक माहिती उघड
Ashok Kharatsaam tv
Published On

Summary -

  • अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे

  • शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे अर्धांगवायूचा झटका

  • खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली

  • एसआयटी तपासातून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता

अभिजीत सोनवणे, नाशिक

अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासातून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अशोक खरात शक्तिवर्धक औषधं घ्यायचा. या औषधांच्या अतिसेवनामुळे खरातला दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्याने उपचार घेतले होते. ज्या डॉक्टरने खरातवर उपचार केले होते तो त्याचा भक्त होता. या डॉक्टरने वेळीच उपचार करून खरातचे प्राण वाचवले होते. आजही खरातच्या एका हाताची हालचाल मर्यादित आहे तर भुवईत बदल दिसून येत आहे.

१५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली. त्याची एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस कोठडीत त्याची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अशोक खरात महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता. त्याने महिलांवर केलेल्या अत्याचाराचे अनेक व्हिडीओ समोर आले आहे. सध्या पोलिस आणि एसआयटी या प्रकरणाचा कसून तपास करत असून रोज नवीन नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.

Ashok Kharat: अशोक खरात घ्यायचा शक्तिवर्धक औषधं, अतिसेवनामुळे अर्धांगवायूचा झटका; तपासातून धक्कादायक माहिती उघड
Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर वासनांध खरातचे ८ अश्लील व्हिडिओ व्हायरल; ६ जणांसह अ‍ॅडमिन कचाट्यात सापडला

दरम्यान, भोंदू बाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. दोन मोठ्या महिला अधिकारी अशोक खरातच्या जाळ्यात अडकल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनी स्वतःसह अनेकांना अशोक खरातकडे नेल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ती आज तक्रार करण्याची शक्यता आहे. या महिलेने एसआयटीशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अशोक खरातचे एकएक कारनामे समोर येत असल्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat: अशोक खरात घ्यायचा शक्तिवर्धक औषधं, अतिसेवनामुळे अर्धांगवायूचा झटका; तपासातून धक्कादायक माहिती उघड
Ashok Kharat Case: महिलांच्या शोषणासाठी खरातचा 'कोडवर्ड'; SIT तपासात धक्कादायक खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com