

भोंदूबाबा अशोक खरातविरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल
उत्तर पूजेच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक
‘ईशानेश्वर महाराज’ सांगत साप दाखवून लोकांची दिशाभूल
अंधश्रद्धा कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा केला दाखल
ज्योतिषी असल्याचे सांगून महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याच्याविरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत त्यांच्याविरोधात ८ गुन्हे दाखल झाले आहेत. उत्तर पूजेच्या नावाखाली एका व्यक्तीची त्याने आर्थिक फसवणूक केली.
वावी पोलिस ठाण्यात खरातने ज्या व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला त्या व्यक्तीनेच खरातविरोधात गुन्हा दाखल केला. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली. २०१८ ते २०२५ दरम्यान खरातने या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देत प्रचंड आर्थिक लूट केल्याचा आरोप आहे.
अशोक खरातने या व्यक्तीला '२१ देशांमध्ये घेऊन जा, तिथल्या मातीला स्पर्श करू दे, तरच भरभराट होईल' असे सांगितले. मागणी न मान्य केल्यास संपूर्ण कुटुंब संपेल, अशी गंभीर धमकी खरातने त्या व्यक्तीला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादीकडून खरातने मर्सिडीज कार खरेदी करून घेतल्याचा आरोप आहे. परदेशात अनेक ठिकाणी हाय-फाय उपचारांचा खर्च फिर्यादीकडून उकळल्याचा दावा करण्यात आला आहे. उत्तर पूजा आहे असे सांगून फिर्यादीला ईशानेश्वर मंदिरात नेल्याचा आरोप आहे.
खरातने पूजेदरम्यान ईशानेश्वर महाराज आले असे सांगत मोठा साप समोर आणल्याचा धक्कादायक दावा फिर्यादीने तक्रारीमध्ये केला आहे. सर्व परदेश दौऱ्यांचा खर्च फिर्यादीकडून करून घेण्यात आला. फार्महाऊसचा संपूर्ण खर्चही त्याच्याकडून उकळण्यात आला. लॉजिस्टिक व्यवसायात प्रगती करण्यासाठी अवतार पूजा आणि परिसाची शक्ती मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आले. खरातने या व्यक्तीला तब्बल ५ कोटी रुपयांना गंडा घातला असल्याचा आरोप त्याने केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.