

अजय सोनवणे
राज्यभरात टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. यामुळे काही ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यानंतर आता नाशिकच्या येवला तालुक्यातील मानरी येथे शेतकऱ्याचे झाडाला लगडलेले टोमॅटो अज्ञात व्यक्तीने तोडून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या येवला तालुक्यातील मानरी येथील शेतकरी तानाजी शेळके यांच्या शेतातील झाडाला लगडलेले टोमॅटो अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास काठीच्या सहाय्याने तोडून शेतातच टाकल्याची घटना घडली आहे.
टोमॅटोला औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी शेळके गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी येवला तालुका पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तान्हाजी शेळके यांनी आपल्या शेतात दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून टोमॅटो लागवड केली. महागड्या दराने औषध खरेदी करून टोमॅटोचे यशस्वी उत्पादन घेतले. त्यांनी आज टोमॅटोवर औषध फवारण्यासाठी गेले असता टोमॅटोच्या सरीत टोमॅटो फळ मोठ्या प्रमाणात खाली पडलेले दिसून आले. दोन ते तीन सऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो तोडून टाकल्याचे दिसून आले. (Nashik Latest News In Marathi)
अज्ञात वस्तूच्या साहाय्याने टोमॅटोच्या झाडावर देखील मार बसल्याने झाडांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोमॅटोची एक गल्ली देखील वाकल्याचे निदर्शनास आली आहे. या नुकसानीतून तान्हाजी शेळके यांचे अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. (Nashik Farmer Latest News)
दरम्यान, सरपंच नंदाराम शेळके, पोलीस पाटील आप्पासाहेब शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष बद्रीनाथ शेळके आदींनी घटनास्थळी पाहणी केली आहे. या घटनेची माहिती येवला तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास येवला पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.