Nashik Road Accident : लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला भरधाव पिकअपची धडक; ५ ते ६ जणांचा मृत्यू

Nashik Road Accident update : नाशिकमध्ये लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
Nashik Road
Nashik Road Accident update Saam
Published On

तरबेज शेख, साम टीव्ही

Nashik Accident : राज्यात अपघाताचं सत्र सुरुच आहे. नाशिकमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर लोकांची मदतीसाठी एकच धावाधाव सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ ते ६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहेत. तर १० ते १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपने मागून धडक दिली. या अपघातामुळे नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातानंतर उड्डाण पुलावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

Nashik Road
Sangli Accident: औषध आणायला जाताना मायलेकींवर काळाचा घाला, कारने रिक्षाला उडवलं, पुलावरून २० फूट कोसळली
Nashik Road
Chhattisgarh Accident : चिमणीनं घात केला, कारखान्यात भीषण अपघात; ढिगाऱ्याखाली २५ हून अधिक मजूर दबले, ८ मृत्यू

नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातानंतर या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातानंतर रोडवर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गेल्या ३० मिनिटांपासून वाहतूक ठप्प आहे. अपघातानंतर लोकांची एकच धावाधाव झाली.

Nashik Road
Beed Crime: धक्कादायक! व्यवसायिक भागिदारांमध्ये पैशाचा वाद, पायाला कुलूप लावून ठेवलं डांबून

दरम्यान, या अपघातानंतर मुंबई नाका आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. या अपघामधील जखमी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हाती आली आहे. अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com