Sangli Accident: औषध आणायला जाताना मायलेकींवर काळाचा घाला, कारने रिक्षाला उडवलं, पुलावरून २० फूट कोसळली

Sangli Car And Rickshaw Accident: सांगलीमध्ये औषध आणण्यासाठी जात असातना झालेल्या अपघातामध्ये मायलेकींचा मृत्यू झाला. सांगलीच्या पुणे-बंगळुरू महामार्गावरील येडेनिपाणी फाटा येथे हा अपघात झाला.
Sangli Accident: औषध आणायला जाताना मायलेकीवर काळाचा घाला, कारने रिक्षाला उडवलं, पुलावरून २० फूट कोसळली
Sangli Car And Rickshaw AccidentSaam Tv
Published On

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये कार आणि रिक्षाच्या भीषण अपघातामध्ये मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये रिक्षा रस्त्यावरून २० फूट खाली कोसळली. अपघातामध्ये मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कारचलाकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या पुणे-बंगळुरू महामार्गावरील येडेनिपाणी फाटा येथे अपघात झाला. महामार्गावरून २० फूट खोल रिक्षा कोसळून झालेल्या अपघातात मायलेकी जागीच ठार झाला. भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने रिक्षा २० फूट रस्त्यावरून खाली कोसळली. अपघातामध्ये रिक्षाचा चुराडा झाला.

Sangli Accident: औषध आणायला जाताना मायलेकीवर काळाचा घाला, कारने रिक्षाला उडवलं, पुलावरून २० फूट कोसळली
Sangli District Bank : सांगली जिल्हा बँकेची २६४ कोटी थकबाकी; सहा संस्थांकडील थकीत वसुलीसाठी रिझर्व बँकेचा दबाव

या अपघातामध्ये अक्काताई भुजंगा येडके (७० वर्षे, नागाव) आणि शारदा लक्ष्मण सुपणे(५० वर्षे, इस्लामपूर) अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मायलेकींची नावं आहेत. या अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. औषध आणण्यासाठी जात असताना ही घटना घडली. या मायलेकी इस्लामपूरमधून कोल्हापूर जिल्ह्यातील पोरले या गावात अर्धांगवायावरील औषध आणण्यासाठी जात होत्या.

Sangli Accident: औषध आणायला जाताना मायलेकीवर काळाचा घाला, कारने रिक्षाला उडवलं, पुलावरून २० फूट कोसळली
Sangli Crime : आरग येथे पद्मावती मातेच्या मंदिरातून १८ तोळे सोने चोरी; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

खासगी रिक्षातून मायलेकी जात असताना कारने रिक्षाला धडक दिल्याने हा अपघा झाला. अपघाताची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे. गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकावर उपचार सुरू आहेत.

Sangli Accident: औषध आणायला जाताना मायलेकीवर काळाचा घाला, कारने रिक्षाला उडवलं, पुलावरून २० फूट कोसळली
Sangli Crime News : चोरीच्या दुचाकी विक्री करत मौजमस्ती; विक्री करतानाच झाला भांडाफोड, १९ मोटारसायकली जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com