सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जासाठी ताब्यात असलेल्या दोन साखर कारखान्यासह सहा संस्थांकडे २६४ कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. या थकीत असलेल्या २६४ कोटी रुपये वसुलीसाठी बँक प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. थकबाकी वसुलीसाठी रिझर्व बँकेच दबाव असल्याचेही समजते. यामुळे जिल्हा बँक थकीत रक्कम वसुलीसाठी लागलेली आहे.
सांगली जिल्हा बँकेचे मार्च २०२५ चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कर्ज वसुली आणि व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. तर यंदाच्या वर्षात बँकेने २२५ कोटी नफ्याचे उद्दिष्ट आहे. बँकेने गेल्या वर्षभरात बड्या बिगर शेती थकीत कर्जदारांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकीदार असलेल्या नऊ संस्थांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल १३० कोटींची कर्ज वसुली केली आहे. यानंतर या बड्या थकबाकीदारांकडील वसुली करण्यात येत आहे.
चार संस्था बँकेच्या ताब्यात
थकीत कर्जासाठी महांकाली साखर कारखाना कवठेमंकाळ, मानगंगा साखर कारखाना आटपाडी या दोन कारखान्यांसह डीवाईन फूड, प्रतिबिंब, विजयालक्ष्मी, शेतकरी विणकर सोसायटी या चार सूतगिरण्याकडे २६४ कोटी रुपये थकबाकी आहे. यातील बहुतांश संस्था राजकीय लोकांशी संबंधित आहे. या सर्व संस्था जिल्हा बँक बँकेने सन २०२० मध्ये ताब्यात घेतलेल्या आहेत. त्याच्याकडून कर्ज वसूली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दोन वर्षात वसुलीची मुदत
दरम्यान थकीत कर्जासाठी या सहा मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर सात वर्षात संपूर्ण थकबाकी वसुली होणे अपेक्षित आहे. अद्याप दोन वर्ष शिल्लक आहेत. यामुळे संस्थांकडे असलेल्या थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी बँक आता अंतिम निर्णय घेण्याच्या विचारात आहे. यामुळे या संस्थांची मुदतपूर्व विक्री अथवा लिलाव प्रक्रियेच्या कायदेशीर मार्गाचा विचार सुरू असल्याचे समजत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.