Nashik Crime News: मुलाला मारल्यावरुन भांडण, जाब विचारला म्हणून आला राग; लिव्ह इन पार्टनरने महिलेसोबत केलं भयानक कृत्य

Nashik Police: महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा लिव्ह-इन पार्टनर श्याम अशोक पवारला पोलिसांनी अटक केली आहे.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam Tv
Published On: 

तरबेज शेख, नाशिक

Nashik News: नाशिकमध्ये (Nashik) लिव्ह-इन पार्टनरने (Live In Partner) महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या होलाराम कॉलनीतील कस्तुरबा नगरमध्ये ही घटना घडली आहे. आरती श्याम पवार (४० वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा लिव्ह-इन पार्टनर श्याम अशोक पवारला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास नाशिकचे सरकारवाडा पोलीस (Sarkarwada Police) करत आहेत.

Nashik Crime News
Chandrayaan-3 Mission: ISRO चं मोठं यश; चांद्रयान ३ पासून विक्रम लँडर झाला वेगळा; चंद्राकडे एकटाच निघाला

मिळालेल्या माहितीनुसार, आरतीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण कौटुंबीक कारणांवरुन तीने पतीला सोडून दिले होते. ती आपल्या मुलांसोबत दुसरीकडे राहत होती. याच कालावधीत आरतीची श्याम पवार नावाच्या व्यक्तीची ओळख झाली. सुरुवातीला मैत्री त्यानंतर हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरती आपल्या मुलांसह श्यामसोबत कस्तुरबा नगरमध्ये राहू लागली.

Nashik Crime News
Devendra Fadnavis Speech : 'हो, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आमचं लक्ष, पण...' फडणवीसांच्या वक्तव्याने CM शिंदे आणि अजितदादांना हसू आवरलं नाही

श्याम आणि आरती यांच्यामध्ये सतत काहीना काही कारणांवरुन वाद होत होते. अशातच मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास श्यामने घरी असताना आरतीच्या मुलाला चापट मारली. त्यातून आरतीने श्यामला विचारणा केली असता दोघांत भांडण झाले. या भांडणावेळी संतप्त झालेल्या श्यामने रागाच्या भरात किचनमधील धारदार सुरी आरतीच्या पाठीत खुपसली.

Nashik Crime News
Ajit Pawar News: 'मोदींशिवाय पर्याय नाही; त्यामुळे काहींच्या पोटात दुखायला लागलं..' अजित पवारांची 'इंडिया' आघाडीवर खोचक टीका

गंभीर जखमी झालेल्या आरतीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला आरतीला काही तरी लागल्याचे भासवले जात होते. पण जिल्हा रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

तर पोस्टमॉर्टम अहवालामध्ये आरतीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नसून तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या लिव्ह इन पार्टनर श्यामला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आरतीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी श्यामला अटक केली असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.